ज्वलंत विषयावर भाष्य करणारा ‘अजिंक्य’ २० मार्चला प्रदर्शित

कोल्हापूर : लुमिनरी सिने  वर्ल्ड निर्मित आणि एक्झाटेक मिडिया प्रस्तुत अजिंक्य हा सिनेमा प्रेषकांच्या भेटीली येत आहे. तरूणांची नेमकी नस आेळखून आधुनिकतेच्या आणि प्रगतीच्या वेगवान प्रवाहात स्वार असणा-या आजच्या पिढीचं प्रतिनिधीत्त्व करणा-या तरूणाच्या संघर्षावर बेतलेला हा सिनेमा आहे. झपाट्याने बदलत जाणा-या शहरातलाच एकभाग असणारा अजिंक्य महत्त्वकांक्षी, ध्येयवेडा तरूण, मिडास टाच या बांधकाम कंपनीचे नेतृत्त्व करत असतो. आपण एक आग्रेसर व्यवसायिक व्हावे अशी त्याची ईच्छा असते. वादळी वेगाने सप्नांचा पाठलाग करणा-या  या  तरूणाच्या आयुष्यात एक रितीका नावाची मुलगी येते. पैशाच्या गणितात तरबेज असणा-या अजिंक्यला स्वंयसेवी संस्था चालवणारी रितीका नात्यातील ओलावा जपण्यास भुरळ घालते. यशाच्या सर्वाेच्च शिखरावर असणारा ध्येयवेडा अजिंक्य माणुसकीला विसरतो आहे. त्याला माणसात आणण्याचं काम रितीका करते अशी ही कथा आहे. भावनाचं क्राँक्रीटीकरण झालेल्या समाजात झालेल्या समाजात माणुसकीचे भान देणारा हा सिनेमा आहे. या सिनेमात भुषण प्रधान व प्रार्थना बहिरे हे प्रमुख भुमिकेत आहेत. त्याचबरोबर उदय टिकेकर, आरूण नलावडे, गणेश यादव, अनिकेत केळकर, वंदना वाकनीस, पल्लवी पाटील यांच्याही सरस प्रमुख भुमिका आहेत. या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद  हे दिग्दर्शक कदीर यांनी लिहलेली आहे. या सिनेमाचे छायांकन माधवराज दातार आणि दिपक पवार यांनी,  तर संकलन रोहित म्हात्रे आणि विनायक कोंडे यांनी केले. झक्कास गाणी आणि दमदार कथेचा उत्तम मेळ असणारा या चित्रपटाचे सहदिग्दर्शन उमेश नार्वेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *