कोल्हापूर : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात फैलावत जाणाऱ्या कोरोनाच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर आज सर्किट हाऊसमधील राजश्री शाहू सभागृहांमध्ये आपत्ती व्यवस्थापन समितीअंतर्गत बैठक पार पडली.
या बैठकीत दौलत देसाई म्हणाले , शाळा,कुटुंब महाविद्यालय , विद्यापीठ व सार्वजनिक ठिकाणी कोरोना संदर्भात जनजागृती करणे गरजेचे आहे कोरोना व्हायरस म्हणजे काय ? हे प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना समजले पाहिजे तेव्हाच त्याच्या कुटुंबापर्यंत योग्य ती माहिती जाईल आपण हातपाय धुतल्याशिवाय जेवायला बसत नाही ही संस्कृती पुढे न्यायला हवी ,सार्वजनिक ठिकाणी असणारे मॉल्स ,पंचतारांकित हॉटेल ,थेटर यांनी मेडिकल स्टाफ नेमावेत जेणेकरून एखादी व्यक्ती संशयास्पद आढळल्यास त्याला तातडीने दवाखान्यात नेता येईल ग्रामपंचायत नगरपालिका व महानगरपालिका या स्थानिक संस्थांनी कोरोना बाबतीत कोणती काळजी घ्यायला हवी, याचे दोन दिवसात होल्डींग लावायला हवेत यासंदर्भात भीती नको फक्त काळजी घेण्यात यावी ,यात्रा उरुस उत्सव या ठिकाणी जाण्यास स्वतःच्या कुटुंबाला जरी रोखली तरी पुरेसे आहे
कोरोनाबद्दल बोलताना अभिनव देशमुख म्हणाले की, एखाद्याला ताप व खोकला असेल तर त्याला कोरोना झाला असे काही नाही. इटली मधून आलेल्या पेशंटने सीपीआरमध्ये स्वतःची तपासणी करून घेतली त्याला काहीही नसल्याचे निष्पन्न झाले. कोरोना साठी कोणतीही लस नसली तरीही मलेरिया साठी वापरण्यात येणाऱ्या औषध आपण यासाठी वापरू शकतो शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असणाऱ्या व्यक्तीला करणाचा अजिबात धोका नाही फक्त गर्भवती महिला, वयस्कर व्यक्ती व ज्यांना श्वासनाचे आजार आहेत त्यांनी स्वतःला जपावं शक्यतो घराबाहेर पडणे टाळावं डॉ.कलशेट्टी म्हणाले, प्रत्येकाने प्रथम आरोग्यदूत म्हणून काम करायला हवे ,कोरोना बद्दल भीती न बाळगता जन जागृती करावी.
या बैठकीस कोल्हापूर पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची प्रमुख उपस्थिती होती