मराठा महासंघाच्या वतीने रविवारी शाहू स्मारक येथे जाहीर सत्कार

कोल्हापूर : राजर्षी शाहूंच्या सामाजिक समतेच्या संकल्पनेतून विविध जातीच्या व धर्माच्या संघटनांना एकत्रित करून शाहू सलोखा मंचाच्या माध्यमातून काम करणारे समाजसेवक वसंतराव मुळीक यांचा जाहीर सत्कार 15 मार्च रोजी मराठा महासंघाच्या वतीने शाहू स्मारक मध्ये करण्यात येणार आहे. श्रीमंत शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री सतेज उर्फ बंटी  पाटील ,कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे.

वसंतराव मुळीक या तळागाळातील कार्यकर्त्याने चाळीस वर्षाहून अधिक काळ सामाजिक क्षेत्रात काम केले तसेच  मराठा महासंघाच्या 225 शाखा स्थापन करून त्यामध्ये अविरतपणे काम करत आहेत त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न असो किंवा शाहूंचे जन्मस्थळ व समाधी स्मारकाचा प्रश्न असो तो सदस्य आंदोलनातून पूर्ण केला तसेच स्थानिक प्रश्नाबाबत आंदोलनात ही त्यांचा सहभाग असायचा या त्यांच्या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल 15 मार्च रोजी त्यांच्या वाढदिवसादिनी सकाळी साडेदहा वाजता त्यांचा जाहीर सत्कार करण्यात करण्यात येणार आहे असे प्रतिपादन मराठा महासंघाच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले या पत्रकार परिषदेस शशिकांत पाटील संदीप पाटील प्रकाश पाटील संदीप देसाई कामगार नेते दिलीप दिलीप जगताप ,संगीता राणे, संयोगिता देसाई ,गीता पवार हे उपस्थित होते

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *