मास्क, सॅनिटायझर जादा दराने विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई -जिल्हाधिकारी

कोल्हापूर  : कोरोना विषाणूच्या उपाय योजनांमधील  मास्क  व सॅनिटायझर  छापील किंमतीपेक्षा जादा दराने  विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर आवश्यक वस्तू अधिनियम 1955 अन्वये कडक  कारवाई करण्यात येईल,अशा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे.

केंद्र शासनाने 30 जून 2020 पर्यंत मास्क वर सॅनिटायझर या दोन वस्तू अत्यावश्यक वस्तू म्हणून घोषीत केल्या आहेत.  आवश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील तरतुदीनुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, निर्धारित किंमती पेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर आवश्यक वस्तू अधिनियम 1955 अन्वये कडक  कारवाई केली जाईल. मास्क  व सॅनिटायझर  सर्वसामान्य जनतेला योग्य व रास्त उपलब्ध करुन द्यावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी  श्री. देसाई यांनी केले.

Advertisements

प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून महानगरपालिका, सर्व नगरपालिका व नगर पंचायत क्षेत्रातील अंगणवाड्या, सर्व सरकारी व खासगी शाळा, महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनावरील शैक्षणिक संस्था साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 मधील तरतुदीनुसार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येण्याच्या सूचना शासनाने दिली आहे. तथापि, 10 वी व 12 वी च्या परीक्षा तसेच विश्वविद्यालयाच्या परीक्षा  विहित वेळापत्रकानुसार होतील. तसेच ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाड्या सुरु राहतील.

जिल्ह्यात परदेशातून आलेले 95 प्रवासी

एकूण 9 जणांची तपासणी करण्यात आली असून उर्वरित 84 जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. अद्याप एकही पॉझिटीव्ह अहवाल आलेला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *