शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख पदी सुजित चव्हाण,रविंद्र माने यांची नियुक्ती….!

विशेष वृत्त अजय शिंगे : 

कोल्हापूर, दि.१७ : 

Advertisements

शिवसेनेचे नेते मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रमुख पदी सुजित रामभाऊ चव्हाण (कोल्हापूर शहर),तसेच रविंद्र माने (कार्यक्षेत्र-हातकणंगले) यांची राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि खासदार धैर्यशील माने यांच्या प्रमूख उपस्थिती मध्ये करण्यात आली

पत्रकार परिषदेत बोलताना राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा प्रचार कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिकापर्यंत पोहचवण्याचे कार्य जिल्हाप्रमुख म्हणून सुजित चव्हाण आणि रविंद्र माने यांना करायचे आहे. शिवसेना पक्षवाढी साठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य करू असा विश्वास दोन्ही जिल्हाप्रमुख यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *