विशेष वृत्त अजय शिंगे :
कोल्हापूर, दि.१७ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सवांतर्गत कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी सकाळी ठीक ११ वाजता “सामूहिक राष्ट्रगीत गायन” उत्साहात संपन्न झाले.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रगीत साठी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके, प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच महसूल विभाग, जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर महानगरपालिकेत कार्यक्रमासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे,उपायुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक संचालक नगररचना रामचंद्र महाजन, जल अभियंता हर्षजित गाटगे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता नारायण भोसले, मुख्य लेखापरीक्षक मिलिंद कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे व इतर महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महालक्ष्मी मंदिर येथे राष्ट्रगीत साठी ची महाराष्ट्र देवस्थान समिती सचिव शिवराज नायकवडे तसेच अन्य पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
जिल्ह्यात शासकीय, खासगी आस्थापना, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठामध्ये ‘सामूहिक राष्ट्रगीत गायन’ उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.