लिपिक असतानाही मनपा निवडणूक विभागात बी एलओ आस्थापना पदावर ठाण मांडून बसलेल्या गणेश आवले याची चौकशी करुन निलंबित करा – कोल्हापुर शहर व जिल्हा नागरी कृती समितीची मागणी….!

विशेष वृत्त जावेद देवडी 

कोल्हापुर : कोल्हापुर महानगरपालिकेत कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या आणि सध्या गेल्या पाच वर्षापासून निवडणूक विभागाकडे बी एलओ आस्थापना या पदावर ठाण मांडून बसलेल्या गणेश दाविद आवले याची संबंधित पदासाठी पात्रता नसल्याने त्याची बदली करुन चौकशी करावी ,आणि त्याला निलंबित करुन त्याच्याविरोधात कड़क कारवाई करावी अशी मागणी कोल्हापुर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांच्याकडे केली.

Advertisements

यासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात गणेश दाविद आवले याची मुळ नियुक्ती पंचगंगा हॉस्पिटलच्या भांडार विभागात आहे.वशिल्याचा वापर करुन घेऊन त्याने निवडणूक विभागात बीएलओ आस्थापना म्हणून आपली नियुक्ती करवून घेतली आहे. कर्मचारी वर्गाला माहीत नसताना त्यांची बीएलओ म्हणून ऑर्डर काढणे, त्यांच्या नावावर बीएलओ मानधन उचलत मनपाची फसवणूक केली आहे.बीएलओ ऑर्डर रद्द करण्यासाठी कर्मचारी वर्गाची त्यांच्याकडून आर्थिक लूट होत असल्याचा आरोपदेखील या निवेदनात करण्यात आला आहे.निवासी उपजिल्हाधिकारी कवितके यानी याबाबत चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन कृती समितीला दिले.यावेळी कृती समितीचे निमन्त्रक अशोक पोवार, रमेश पोवार, भाऊ घोड़के, कादरभाई मलबारी, लहूजी शिंदे, राजू मालेकर,विनोद डुनुंग, महादेव जाधव, चंद्रकांत पाटील, रणजीत पोवार , महेश जाधव,महादेव जाधव, उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *