कोल्हापूर दि.१७: कोल्हापूर वर्ष २०१५ ते २०२१ या ७ वर्षांच्या कालावधीत ‘महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने हिंदूंच्या दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांवर ध्वनीप्रदूषण केले म्हणून २३० खटले दाखल केले आहेत, तर मुसलमानांवर केवळ २२ खटले दाखल आहेत, असे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. यातील एकूण २५२ खटल्यांपैकी २३०खटले हे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी उत्सव साजरे करणारी मंडळे, संघटना अथवा कार्यकर्ते यांच्यावरच झालेले दिसतात. २२ खटले हे मुसलमानांच्या संदर्भातील असले, तरी त्यातील सर्वच गुन्हे मशिदींबाबत आहेत, असे नाही. एकूणच ९१ टक्के गुन्हे हे हिंदूंवर आणि ८ टक्के गुन्हे हे मुसलमानांवर दाखल झालेले आहे. हा कारवाईमध्ये सरळसरळ पक्षपात केला जात आहे. भारतीय राज्यघटनेनुसार नियम-कायदे सर्वांना सारखे असतांना हा पक्षपात इतके वर्षे का केला जात आहे ? मुसलमान विशेष नागरिक असल्याने त्यांना कायद्यात सूट दिली आहे का ? याचा अर्थ वर्षातून एकदाच येणान्या गणेशोत्सवामुळे प्रदूषण होते असे प्रदूषण नियंत्रण मंडळ सांगते आणि दुसरीकडे अन्य धर्मियांवर मात्र कायदा मोडला जात असून कोणतीही कारवाई होत नाही तरी केवळ हिंदू सणांच्या वेळी प्रदूषणविरोधी कायद्याचा गैरवापर करणान्या ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संबंधित अधिकान्यांना तात्काळ निलंबित करून कारवाई करावी, तसेच बकरी इंद, मोहरम आणि अन्य धर्मिय वा पंथीयांच्या सण-उत्सवांच्या वेळी होणान्या प्रदूषणाविषयी अभ्यासपूर्ण अहवाल तयार करावेत आणि ते प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावेत, अशी मागणी या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केली. या प्रसंगी बाल हनुमान तरुण मंडळाचे उपाध्यक्ष सुनील चौगुले, पंचमुखी मंडळाचे श्री. अजय पाटील, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा
वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कृती केली जात नाही; मात्र तेच पालिका प्रशासन आणि पर्यावरणवादी वर्षातून एकदाच येणाऱ्या गणेशोत्सवाला प्रदूषणास जबाबदार ठरवतात. अनेक ठिकाणी बलपूर्वक गणेशमूतीचे दान करण्यास किंवा कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यास सामान्य गणेशभक्तांना भाग पाडले जात आहे.
माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार काही ठिकाणी या मूर्ती कचरा भरण्याच्या गाडी’तून वाहून नेल्या जातात. त्यामुळे श्रीगणेशमूर्तीची विटंबना होऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. साखर कारखान्यांचे पाणी पंचगंगा नदीत सोडल्याने हजारो मासे मृत झाल्याच्या घटना गेल्या दोन वर्षांत पडलेल्या आहेत. या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणतीही ठोस कृती केलेली नाही. इचलकरंजी येथील गणेश मंडळांनी श्री गणेशमूर्ती विसर्जनास पंचगंगा नदीतच श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती देण्यात यावी, अशी ठाम मागणी केली आहे. त्यामुळे कोल्हापुरातही प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या धर्मबाह्य संकलना न राबवता पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती बिसर्जनास अनुमती द्यावी, अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली.
या मागणीला संभाजीराव ओके, शिवसेना जिल्हा उपप्रमुख,शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, तसेच हिंदुत्वनिष्ठ शरद माळी यांचा पाठिंबा आहे.