झी मराठी घेऊन येते आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी मालिका – “”अप्पी आमची कलेक्टर””….!

कोल्हापूर : झी मराठी वर अप्पी आमची कलेक्टर या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. या मालिकेत अपर्णा माने (अप्पी) ह्या मध्यवर्ती भूमिकेतुन नवोदित अभिनेत्री शिवानी नाईक पदार्पण करणार आहे. ही मालिका एक वेगळा विषय घेऊन येत आहे. अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, ही ती मुलगी आहे जी ग्रामीण भागातील खेडे गावात रहाते. जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन नाही.पण तिचं ध्येय खुप मोठ्ठ आहे. तिला येणा-या आर्थिक, शैक्षणिक आणि  सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होते. अशी ही संघर्ष कथा आहे.ह्या मालिकेची निर्मिती वज्र Production ने केली आहे.

पत्रकारांशी बोलताना अप्पी म्हणजे शिवानी नाईक म्हणाल्या, ही भूमिका माझ्यासाठी  खूप प्रेरणादायी आहे .झी मराठी वाहिनीवर ‘अप्पी आमची कलेक्टर’ हि नवीन मालिका २२ ऑगस्ट ,संध्याकाळी ७:०० पासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ह्या मालिकेतून अभिनेत्री शिवानी नाईक स्मॉल स्क्रीनवर पदार्पण करत आहे. शिवानी ने आजवर अनेक एकांकिका आणि व्यावसायिक नाटकातून आपली अभिनयाची छाप पाडली आहे. प्रोमोमध्ये सगळ्यांनी अप्पी ला पाहिलं आणि या भूमिकेतूनदेखील शिवानी प्रेक्षकांचं भरघोस प्रेम मिळवणार आहे. या मालिकेबद्दल व आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शिवानी म्हणाली कि, ”  ही मालिका एक वेगळा विषय घेऊन येत आहे. मी ह्या मालिकेत अपर्णा सुरेश माने ची भूमिका साकारत आहे . तिचे बाबा रिक्षा चालवतात.तिचा छान घर आहे आणि  त्या घरात आई , बाबा आणि भाऊ राहतात. तीच एक स्वप्न आहे कलेक्टर व्हायचं आहे आणि ते ती कस साध्य करते हा तिचा प्रवास दाखवणार आहे. हे मालिकेतून प्रेक्षकांना हळू हळू उलगडत जाईल. अप्पी सामाजिक आणि कौटुंबिक अडचणींचा सामना करून काही तरी करू पाहते आणि हि भूमिका माझासाठी खूप प्रेरणादायी आहे. ह्या भूमिकेसाठी मी खूप मेहेनत घेते आहे आणि मालिका प्रेक्षकांना आवडेल अशी अपॆक्षा ठेवते.”

Advertisements

तेव्हा पाहायला विसरू नका. ‘आप्पी आमची कलेक्टर ‘ २२ ऑगस्टपासून, सोमवार ते शनिवार संध्या. ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *