विशेष वृत्त अजय शिंगे
कोल्हापूर : शुक्रवार दिनांक २६ रोजी शिवसेना शहर कार्यकारणी निवड कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सौ प्रियंका संदिप पाटील यांची महिला उपशहर संघटीका म्हणून निवड करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या हस्ते त्यानं नियुक्त पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
कोल्हापूर शिवसेना यांच्या वतीने मंथन संवाद बैठक आयोजित केली होती. विविध गोष्टींवर चर्चा करून झाल्यानंतर. पुढील काळात शिवसेनेचे काम आणखी बळकट आणि लोकहिताचे झाले पाहिजे याकरिता शहरातील कार्यकरणी निवडीचा पहिला टप्पा पार पडला.या मध्ये शिवसेना सोबत गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेने काम करणाऱ्या व्यक्तींना शहरातील जवाबदारी म्हणून विविध पदांवर त्यांची नियुक्ती करण्यात आली.या मध्ये प्रियंका पाटील यांचे कार्य पाहून त्यांची कोल्हापूर शहर महिला उप-संघटीका म्हणून निवड करण्यात आली
प्रियंका पाटील यांचा थोडक्यात परिचय….
प्रियांका संदीप पाटील या राहायला रविवार पेठ कोल्हापूर येथे असून,गेली ६ वर्षे शिवसैनिक म्हणून शिवसेना महिला आघाडी मध्ये कार्यरत आहेत. याचीच दखल घेऊन त्यांची वरील पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.उद्यम नगर प्रभागातून शिवसेनेतून महापालिकेची निवडणूक लढवण्याची त्यांची तयारी सुरू आहे.कोविड काळात मोफत धान्य वाटप, मोफत औषधें वाटप,त्याच बरोबर इतर ही सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत त्या गेली १० वर्षे युवासेना जिल्हा प्रमुख म्हणून काम करणारे संदीप पाटील यांच्या पत्नी आहेत.इथून पुढच्या काळात शिवसेनेच्या माध्यमातून महिलांचे प्रश सोडवण्यासाठी कार्य करत राहणार त्याच बरोबर महिलांना रोजगार व व्यावसायिक प्रशिक्षण देणेचा मानस देखिल त्यांचा आहे.