पाटील विरूद्ध महाडिक महाभारत रामायण मुळे रंगलेल्या राजकिय वातावरणाचा विस्फोट होण्याची शक्यता…? गोकुळ ची आज सभा….!

विशेष वृत्त अजय शिंगे

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज महासैनिक दरबार हॉल कोल्हापूर येथे दुपारी १वाजता होणार असून, जिल्ह्यातील राजकारणाचे मूळ स्थान असणारे पाटील विरूद्ध महाडिक आज पुन्हा एकदा या सभेनिमित्त आमने-सामने येणार आहेत. दहीहंडी पासून सुरू झालेल्या महाभारत रामायण टिकेचे तीव्र पडसाद या सभेत उमटण्याची शक्यता आहे. सत्ताधारी गट आणि विरोधी गट यांच्यामध्ये गेली काही दिवस आरोप प्रत्यारोप होत आहेत, त्यामुळे आजची सभा नक्कीच खूपच वादग्रस्त होणार.

 महाभारत रामायण मुळे पेटलेले जिल्ह्याचे राजकीय वातावरण आज कोणते वळण घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने,मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सत्तांतर नंतर गोकुळची ही पहिली सभा. सत्ताधारी गट विरोधी गटाच्या प्रश्नांची उत्तरे कोणत्या पद्धतीने देतील की दबाव तंत्रामुळे विरोधी गटाला त्यांचे प्रश्न उत्तरे मिळणार नाहीत असे झाल्यास समांतर सभा होणार अशी सूचना विरोधी गटाने यापूर्वीच दिलेली आहे. ओळखपत्र पाहूनच प्रत्येक व्यक्तीला आत मध्ये प्रवेश दिला जाईल,अशा सूचना पोलिस प्रशासनाकडून आलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *