विशेष वृत्त अजय शिंगे
कोल्हापूर : भारताने १० महिन्यापूर्वी झालेल्या सामन्यातील पराभवाचा त्याच मैदानातील सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारत बदला घेतला. आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली सामन्याच्या अतिशय महत्वाच्या क्षणी आऊट झाल्याने भारतीय संघावर दडपण आले होते. परंतु त्यानंतर रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या यांनी जिगरबाज फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. जडेजाने ३५ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली, तर हार्दिकने नाबाद ३३ धावा काढत भारताला विजयी करण्यात मोलाचे योगदान दिले
भारताचा विजयी होताच कोल्हापूरातील क्रिकेटप्रेमी जनता छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमू लागले. हळू हळू हजारो लोक एकत्र येऊन विजयी जल्लोष साजरा करू लागले.विजयी घोषणा, फटाक्यांची आतषबाजी, तसेच, गाड्यांचा आवाज या जल्लोषाने कोल्हापूरकरांनी आज दिवाळीच साजरी केली. लहान मुले मुली महिला वर्ग आणि तरुणाई हातात तिरंगा घेऊन हजारो लोक रस्त्यावर आल्याने अतीशय सुंदर असे जल्लोषी वातावरण अनुभवायला मिळाले.