अंबप विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेची ८३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न…!

विशेष वृत्त प्रकाश कांबळे

कोल्हापूर : विविध सेवा संस्था मर्यादित अंबप या संस्थेची ८३ वी सभा उत्साहात संपन्न झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ बी.के.पाटील साहेब होते . प्रमुख पाहुणे के.डी.सी सी बँकेचे बँक निरीक्षक सुभाष निंबाळकर साहेब होते.बापुसो पाटील सहकार समूहाचे प्रमुख अँड.राजवर्धन पाटील(साहेब), सुरेश बापूसो पाटील पतसंस्थेचे चेअरमन सोमराज पाटील(दादा), यांनी मनोगत व्यक्त केले.

Advertisements

संस्थेचे चेअरमन यांनी खालील प्रमाणे माहिती सांगितली , संस्थेस निव्वळ नफा ३, लाख २२ हजार ,भाग भांडवल ३६,लाख सभासदांना कर्ज वाटप दोन कोटी २५लाख, गुंतवणूक ४० लाख, २५४ सभासदांना प्रोत्साहनपर लाभ १कोटी २५ लाख होणार असल्याचे सांगितले.अंबप विकास सोसायटीचे व्हा.चेअरमन पोपट जाधव यांनी स्वागत केले ,अहवाल वाचन संस्थेचे सेक्रेटरी हिंदुराव मुळीक यांनी केले , सूत्रसंचालन मिलिंद थोरात यांनी केले, संस्थेचे जेष्ठ संचालक वसंतराव विभुते यांनी आभार मानले. 

 यावेळी विनय कोरे पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन सुदाम पाटील , बापूसो पाटील दूध संस्थेचे व्हाईस चेअरमन महादेव सुरवंशी , संस्थेचे संचालक शशिकांत पाटील,जालिंदर पाटील , सुनील कानडे, मारुती माळी, शिवाजी वाघमोडे ,अमोल माळी, वसंतराव विभुते, कृष्णात गायकवाड, कृष्णात शिंदे, भीमराव डोंगरे , जनार्दन कापसे , कविता दाभाडे ,संजीवनी माळी,अनिल डोंगरे, प्रदीप पाटील , जनार्दन कापसे , दिलावर बेडग ,ज्ञानदेव डोंगरे , आनंदा कांबळे सभासद मोठ्या संख्येने हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *