गोकुळच्या सर्वसाधारण सभेवर विरोधी गटाचा बहिष्कार…!

विशेष वृत्त अजय शिंगे  

 कोल्हापूर : गोकुळ दूध संघातील सत्तांतरानंतर आज पहिल्यांदा गोकुळची ऑफलाईन सर्वसाधारण सभा होती. सभेच्या सुरूवातीपासून विरोधक गटाने आक्रमक भूमिका घेतला होता. सत्ताधारी गट आणि विरोधी गट यांच्या घोषणेने संपूर्ण परीसर दणाणून गेला होता. घोषणाबाजी केल्याने संपूर्ण वेळ गोंधळ निर्माण झाला होता. गोकुळच्या विद्यमान संचालिका शौमिका महाडिक यांनी स्टेजवर जाण्यास नकार दिल्याने वातावरण खूपच गोंधळाचे बनले होते. 

Advertisements

सभेला आज आमदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील माजी मंत्री हसन मुश्रीफ देखील उपस्थित होते. विरोधी सभासद येण्या आधी सभागृह भरल्याने. संचालिका शौमिका महाडिक यांनी आम्ही येण्यापूर्वी सभगृह भरले कसे? असा प्रश्न उपस्थित केला, आमच्या प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय सभा सुरू करायची नाही , असा आक्रमण पवित्रा महाडिक यांनी घेतल्याने सभेत खूप वेळ गोंधळ निर्माण झाला होता. पाटील महाडीक या दोन्ही गटात कडून घोषणाबाजी जोरदार घोषणाबाजी सुरू होती.

कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये सुरू असलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक ठिकाणी पोलिस चौकशी शिवाय कुणालाच आत मध्ये सोडत नव्हते. गोकुळच्या दूध संघाच्या यावर्षीच्या कारभारावरून गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी गट आणि विरोधी गट यांचे आरोप-प्रत्यारोप सुरूच होते. गोकुळची ६०वी सर्वसाधारण सभा वादळी ठरली. संचालिका महाडिक  यांनी सभेचा त्याग केल्याने खूप गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. विरोधी गटाच्या सभासदांना हॉल भरल्याने शेवटच्या रांगेत बसावे लागेल त्यामुळे. त्यांच्या मध्ये प्रचंडी नाराजी दिसून येत होती. संचालिका शौमिका महाडिक यांनी हॉलमध्ये प्रवेश करताच जोरदार घोषणाबाजी सुरू झाली.

पत्रकारांशी बोलताना शौमिका महाडिक म्हणाल्या की “आमच्या काही प्रश्नांची संचालकांनी साध्या सोप्या भाषेत उत्तरे द्यावी आमची इतकीच मागणी होती. परंतु त्यांना सभासदांच्या सध्या सोप्या प्रश्नांची उत्तरे देणे कठीण झाले होते . आमच्या समोर असून देखील डोळ्यात डोळे घालणंही त्यांना जमले नाही.सभे मध्ये सर्व निर्णय चुकीच्या पध्दतीने घेऊन आपल्या चुकांवर पडदा टाकण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न सुरू होता. आमच्या एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर त्यांना देता आले नाही, अशी जोरदार टीका शौमिका महाडिक यांनी केली. कार्यकारी संचालकांनी स्वत:ते किती टँकर लावले आहेत.कुणाला किती फायदा करून देत आहेत, याचा खुलासा सर्वांसमोर करावा अशी मागणीही यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *