कोल्हापूर( प्रतिनिधी): युवा पत्रकार संघाचा कार्याविस्तार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात करण्यासाठी आपण अग्रस्थानी राहून प्रयत्नरत राहू , अशी ग्वाही न्युज पेपर भारतीय माहिती अधिकार चे संपादक शौकत नायकवडी यांनी येथे बोलताना दिली .शौकत नायकवडी यांची युवा पत्रकार संघाच्या राज्य कार्याध्यक्ष महणून कार्यकरिणीवर निवड झाल्याबद्दल संघाचे प्रदेश अध्यक्ष रतन हुलस्वार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला .
या वेळी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी प्रकाश कांबळे, राज्य उपाध्यक्ष जावेद देवडी यांच्या हस्ते तर कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदी शरद माळी यांची प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव वळवडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आला.संघाचे कायदे विषयक सल्लागार विधीतज्ञ अँड. संदीप पोवार व संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडी झाल्या.
यावेळी बोलताना संस्थापक शिवाजी शिंगे यांनी मा. शौकत नायकवडी यांच्या सारखे माहिती अधिकार क्षेत्रातील दिगंग्ज युवा पत्रकार संघाचे नाव लवकरच राज्यातील दुर्गम भागापर्यंत देखील झळकवतील याची मला खात्री असल्याचे नमूद केले .अशी व्यक्ती युवा पत्रकार संघ परिवाराचा सक्रिय घटक म्हणून पुढे येणे ही बाब युवा पत्रकार संघासाठी गौरवास्पद असल्याचे उदगार त्यांनी काढले.लवकरच युवा पत्रकार संघाच्या वतीने चमकदार कामगिरी करणाऱ्या पदाधिकारी यांचा युवा पत्रकार संघाच्या वतीने सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार असल्याची घोषणा शिंगे यांनी या वेळी बोलताना केली. शेवटी राज्य सरचिटणीस अजय शिंगे यांनी आभार मानले.