कोल्हापूर : कोरोनाच्या महामारी नंतर पहिल्यादांच कोल्हापुर मध्ये गणरायाचे स्वागत जल्लोषी वातावरणात करण्यात आले. कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने गेले ८ दिवस कोल्हापूरकर बाप्पाचे स्वागत करण्याच्या तयारीत होते.खरेदी साठी बाजारपेठा हाऊसफुल झालेल्या. सकाळी ८ वाजल्यापासून कोल्हापुरातील प्रत्येक गल्ली मध्ये गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया,आला रे आला गणपती आला अशा जोरदार घोषणांनी कोल्हापूरचे वातावरण खूपचं भक्तिमय झाले.
कोल्हापुरातील शाहूपुरी कुंभार गल्ली, बापट कॅम्प, गंगावेश येथून घरगुरती बाप्पांच्या आगमनासाठी सकाळपासून एकच गर्दी होती.लहान मुले ते वयोवृद्ध व्यक्ती देखील बाप्पा स्वागतासाठी बाहेर पडले होते. Dj ची परवानगी दिल्याने सकाळपासूनच डॉल्बी ठेक्यावर नाचत तरुण मंडळांनी आपल्या गणरायाचे स्वागात केले.
प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात विघ्नहर्त्या गणरायाचे स्वागत करण्यात आले. ढोल-ताशा आणि टाळ-मृदंगाचा गजरही पाहायला मिळाला. कोल्हापूर शहरातील आणि उपनगरातील रस्ते गणरायाच्या स्वागतासाठी फुलून गेले होते. ‘ घरगुती गणपतीची दुपारपर्यंत प्रतिष्ठापना करण्यात आली.