श्री दत्त विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्यादित वाठार तर्फ वडगांव या संस्थेची ८९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न….!

विशेष वृत्त प्रकाश कांबळे 

कोल्हापूर : श्री दत्त विविध सेवा संस्था मर्यादित वाठार तर्फ वडगांव या संस्थेची ८९ वी वार्षिक सभा चिंतामणी मंगल कार्यालयामध्ये उत्साहात संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन विजय माने होते . प्रमुख पाहुणे म्हणून नानासो मस्के, बाबुराव पोवार होते.संचालक महेश जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.संस्थेचे चेअरमन यांनी खालील प्रमाणे माहिती सांगितली , संस्थेस निव्वळ नफा ५ लाख ८८ हजार , सभासदांना कर्ज वाटप १ कोटी २८लाख, गुंतवणूक ३० लाख, डिव्हिडंड १०% तर सभासदांना प्रोत्साहनपर लाभ होणार असल्याचे सांगितले.

Advertisements

   यावेळी PHD प्राप्त डॉ स्वाती पाटील, कोरोनाच्या काळामध्ये धान्य वाटप केल्या बद्दल कोरोना योद्धा म्हणून सेल्समन जावेद सौदागर, संस्थेस सतत ऑडिट वर्ग ” अ “मिळाल्याबद्दल सचिव गजानन शिंदे, सिकंदर मोमीन, संस्थेचे मार्गदर्शक नानासो मस्के, बाबुराव पोवार तज्ञ् संचालक मोहन पाटील, सुरज चव्हाण,वारणा दुध संघ संचालक महेंद्र शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी अहवाल वाचन संस्थेचे सेक्रेटरी गजानन शिंदे यांनी केले , प्रास्ताविक मोहन पाटील यांनी केले तर संस्थेचे संचालक विष्णू शिंदे यांनी आभार मानले.

      यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन गजानन कुंभार संचालक परशुराम मस्के,सुनील शिंदे, उमेश पाटील, महेश जगताप,बागल पटाईत, शिवाजी कुंभार, दिलीप वाकसे, सुगंध कांबळे, श्रीमती सुनीता शिंदे, मुमताज पिंजारी यांचे सह सभासद मोठ्या संख्येने हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *