विशेष वृत्त प्रकाश कांबळे
कोल्हापूर : वाठार ता हातकणंगले येथील कुंभार समाज गणेश मंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा व महाआरती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर चे कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील,के पी कुंभार सर होते
यावेळी बोलताना डॉ डी टी शिर्के म्हणाले की कुंभार समाज गणेश मंडळाने परंपरेने चालू ठेवलेल्या एक समाज एक गणपती ही संकल्पना अतिशय योग्य आहे यामुळे समाज मध्ये एकजूट आहे तसेच मूर्तीकारानी खूप सुंदर अशी मूर्ती बनविलीबद्दल त्याचे कौतुक केले मंडळाने अतिशय उत्कृष्ट नियोजन व संयोजन केले आहे यावेळी मूर्तीकार अजित अनिल कुंभार, अभिजित अनिल कुंभार या दोन भावानी तसेच यांना मदत करणारे संतोष आनंदा कुंभार यांचा कुलगुरू च्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अमित शिर्के,अशोक कुंभार सर, डॉ सारंग शिर्के, डॉ विनायक कुंभार,डॉ वैभव कुंभार, ग्रा पं सदस्य महेश शिर्के, सुहास पाटील, युवा पत्रकार संघ पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे ओंकार कुंभार, दिपक कुंभार, अतुल शिर्के, प्रमोद कुंभार, बबन कुंभार, वैष्णव शिर्के, जयदीप शिर्के, सुयश शिर्के, वैभव शिर्के, सुयोग कुंभार, सोहम शिर्के, सुमित शिर्के, योगेश शिर्के मंडळाचे अध्यक्ष पलाश कुंभार, उपाध्यक्ष प्रथमेश शिर्के, खजिनदार पंकज कुंभार, राकेश कुंभार यांच्या सह कुंभार समाजातील तरुण कार्यकर्ते महिला गावातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक ग्रा पं सदस्य महेश शिर्के यांनी केले तर आभार अध्यक्ष पलाश कुंभार यांनी मानले