Share Now
Read Time:1 Minute, 8 Second
कोल्हापूर : कोतोली ही पश्चिम पन्हाळ्यातील प्रमुख बाजारपेठ असून सद्यस्थितीत कोतोली आरोग्य केंद्रात दैनंदिन १५० हुन अधिक नागरिक आरोग्य तपासणीसाठी येत असतात. आरोग्य केंद्रात नागरिकांना उत्तम सेवा दिली जात असून वैद्यकीय मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रात तात्काळ मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे तसेच नागरीकांच्या सोयीने हे आरोग्य केंद्र अत्यंत महत्त्वाचे असल्याने यास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी सरपंच प्रकाश पाटील यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्याकडे केली. याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी यावेळी दिले
Share Now