उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासकिय यंत्रणांनी समन्वय ठेवावा : आमदार सतेज पाटील…

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:6 Minute, 46 Second

कोल्हापूर : जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून काम करावे अशा सूचना आमदार सतेज पाटील यांनी केल्या आहेत. उद्योजकांच्या विविध समस्या, प्रलंबित प्रश्न यासंदर्भात कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. स्थानिक पातळीवरील समस्यांची तातडीने सोडवणूक करावी, तर राज्य पातळीवरील समस्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे. तसेच तीन महिन्यांनी आढावा बैठक घेण्याच्या सूचनाही आमदार पाटील यांनी यावेळी दिल्या.

   कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी उद्यमनगर, शिरोली, गोकुळ शिरगांव, कागल एमआयडीसी, इचलकरंजी, जयसिंगपूर, हातकणंगले आणि शिरोळ येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या उद्योजकांना शासन स्तरावर काही अडचणींना सामोरे जावे लागते. याबाबत औदयोगिक संघटना उद्योजक, आमदार व शासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशन, उद्यमनगर येथे पार पडली. आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये उद्योजकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष हर्षद दलाल, आयआयएफचे चेअरमन सचिन शिरगावकर, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

    या बैठकीमध्ये औद्योगिक क्षेत्रातील एफएसआय, एल. बी.टी., बी टेन्यूअर, रुपांतरीत कर, ग्रामपंचायत कर तसचं भूमिगत विज वाहिन्या त्याचबरोबर कामगारांसाठी असलेली ई एस. आय. हॉस्पिटल सुविधा, पर्यावरण विषयक बाबी आणि उद्योग क्षेत्रातील अडचणी अशा विविध विषयावर चर्चा करून उद्योजकांचे प्रश्न समजावून घेण्यात आलेत. या प्रत्येक विषयावर या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायत क्षेत्रातील उद्योजकाकडून आकारण्यात येणाऱ्या करामध्ये सुसूत्रता आणण्याच्या सूचनाही या बैठकीमध्ये आमदार सतेज पाटील यांनी केल्या.

कोल्हापूरमध्ये अनेक उद्योग व्यवसाय येण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे नवीन एमआयडीसी व्हावी या संदर्भातही आमदार पाटील यानी या बैठकीत सूचना केली. विकासवाडी येथील २३५ हेक्टर जमीन नवीन एमआयडीसीसाठी प्रस्तावित असून, यामध्ये लघु उद्योगांना प्राधान्य देण्याची भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान कोल्हापूर इंजनिअरिंग असोसिएशन अध्यक्ष हर्षद दलाल यांनी, शिवाजी उद्यमनगर, वाय.पी. पोवारनगर व पांजरपोळ येथील एफएसआय सध्या १.१० आहे तो ३ करावा, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील औद्योगिक वसाहती मधील कचरा उठाव हा दिवसा न करता रात्रीच्या वेळी करावा, तसचं अतिक्रमणामुळे पार्किंगची अवस्था गंभीर झाली असून कित्येक नादुरूस्त वाहने, मोठ्या क्रेन रस्त्याकडेला जागा आडवून आहेत. वाहतुक सुरळीत ठेवण्याची व्यवस्था नियमितपणे करावी यासह इतर विविध मागण्या बैठकीमध्ये केल्या.     

कचरा व स्वच्छतेची समस्या मार्गी लावण्यासाठी उद्योजक व तरुणांचा दबाव गट तयार होणे गरजेचे आहे. यांनी एकत्र येऊन ऍप तयार करावें, यात कोणत्या वार्डमध्ये कचरा साठलाय, कोण व किती कर्मचारी काम करतायत याची माहिती मिळावी व समस्या नोंद व निराकरण यासाठी त्याचा वापर व्हावा अशी अपेक्षा आमदार सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

उद्योग गुजरातला जातात हे दुर्दैव

फॉक्सकॉन, वेदांता सारखे राज्यात येऊ घातलेले उद्योग गुजरातला जातात हे दुर्दैवी आहे. या उद्योगांमूळे लाखो तरुणांना मिळू शकणार रोजगार हिरावला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.

 या बैठकीला उद्योजक संजय पेंडसे, मोहन पंडितराव, दीपक पाटील, सचिन शिरगावकर, प्रसन्न तेरदाळकर, कमलाकांत कुलकर्णी, प्रदीप भाई कापडिया, संगीता नलवडे, हिंदूराव कामते, एम वाय पाटील, अरुण जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, तहसीलदार शितल मुळे भामरे, शिल्पा ठोकडे, शरद पाटील, कल्पना ढवळे, राहुल भिंगारे प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी, मंजुषा चव्हाण ( डीआयसी व्यवस्थापक ), प्रमोद माने ( उपप्रादेशीक अधिकारी प्रदुषण )अंकुर कावळे अधीक्षक अभियंता महावितरण, सहायक आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आर एस महाजन, सुदाम जाधव अधिक्षक भूमिअभिलेख,जगन्नाथ साळोखे ( एमपीसीबी), ईएसआय चे हेमंत यादव, सागर पाटील (सहायक पोलीस निरीक्षक ) प्रणाली पवार ( पोलीस उपनिरीक्षक )आदी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *