Share Now
Read Time:1 Minute, 22 Second
कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत दुर्गा दर्शन बससेवेचा पास वितरण शुभारंभ नुकताच पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हॉटेल मुरली, त्रिवेणी व दख्खनचे मालक मनोज पुरोहित आणि रोटरी क्लब ऑफ करवीर चे प्रेसिडेंट प्रशांत उर्फ उदय पाटील हे उपस्थित होते.
दुर्गा दर्शन वाहतूक प्रमुख सुनील जाधव यांनी स्वागत केले. प्रथम पास खरेदीचा मान अर्चना शिंदे आणि प्रियंका पाटील यांना मिळाला. कार्यक्रमास सहाय्यक वाहतूक निरीक्षक सुनील पाटील, नितीन पोवार, अनिल बोरचाटे, सुनील अकिवाटे समीक्षा पाटील, तनुजा पाटील, अपघात प्रमुख पी. बी. जाधव, वाहतूक नियंत्रक अरुण घाडगे, बी बी साबळे, सुबराव कोळी, हेमंत हेडाऊ, अर्जुन चौगुले आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखा सहाय्यक फौजदार कुंभार हे प्रमुख उपस्थित होते
Share Now