व्यवसायाबरोबर स्वतःचेही ब्रॅण्डिंग हि काळाची गरज: देवयानी पवार व्यवसायाबरोबर स्वतःचेही ब्रॅण्डिंग हि काळाची गरज: देवयानी पवार
_केआयटीमध्ये 'वॉक विथ वर्ल्ड'तर्फे  फ्लायर्स कार्यशाळा संपन्न

0 0

Share Now

Read Time:5 Minute, 8 Second

कोल्हापूर : “व्यवसायाबरोबर स्वतःचेही ब्रॅण्डिंग हि काळाची गरज असून आपल्या व्यक्तिमत्वाची छाप दुसऱ्यावर पडणे तितकेच महत्वाचे आहे” असे मत  सुप्रसिद्ध डीपी मीडिया हाऊसच्या सीईओ देवयानी पवार यांनी व्यक्त केले. त्या कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयातील ‘वॉक विद वर्ल्ड’ या विद्यार्थी समितीने आयोजित केलेला फ्लायर्स २०२२ या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. या वेळी  केआयटी चे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी  अध्यक्षस्थानी तर  विद्यार्थी उपक्रम प्रमुख डॉक्टरअक्षय थोरवत, उदय भापकर, ड़ॉ . अमित सरकार यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिनिव्हा येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फॉर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करून नुकत्याच परतलेल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या देवयानी पवार यांनी मार्केटिंग या विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या ‘कोरोना महामारी मध्ये ऑनलाइन नसणाऱ्या व्यवसायांना भयंकर फटका बसला व ते न होण्यासाठी व्यवसाय ऑनलाइन नेणे व त्याचे मार्केटिंग करणे किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित केले’. ग्राहकांची गरज व बाजार परिस्थिती ओळखून व्यवसायात उतरणे किती फायदेशीर आहे हे त्यांनी सांगितले. ”तुम्हाला आयुष्यात काय मिळवायचे आहे हे तुम्ही ओळखा व तेच ध्येय प्राप्त करण्याचा तुम्ही प्रयत्न करा” असा सल्ला पवार यांनी दिला. ब्रँडिंग, लोगो, मिशन स्टेटमेंट या संज्ञांचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. ’’कौशल्य ही जन्मताच मिळत नसतात तर ती मिळवावी लागतात ‘’ असे त्या म्हणाल्या. ”मी माझी कंपनी कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय चालू केली व वाढवली” असे त्या त्यांच्या कंपनीचे वर्णन करताना म्हणाल्या. संवाद कौशल्य व तसेच भावनात्मक गुणांक (EQ) हा आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे असे त्या भाषणाचा शेवट करताना म्हणाल्या. सादरीकरणाच्या शेवटच्या टप्प्यात प्रश्नोत्तर सत्र रंगले व कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे आभार वॉक विथ वर्ल्ड च्या सेक्रेटरी चेतना लुल्ला यांनी मांडले !!!

’बाय द स्टुडंट्स, फॉर द स्टुडंट्स’ या मूल्यावर काम करणारी समिती म्हणून वॉक विथ वर्ल्ड ची ओळख आहे. ’सीनियर्स टीचिंग जूनियर्स’ या संकल्पनेवर आधारित फ्लायर्स हा कार्यक्रम या समितीचा मूलभूत उपक्रम आहे. २५ व २६ तारखेला ज्युनिअर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इंटर्नशीप च्या विविध संधी, इंटरव्हियु स्किल्स या विषयावर सेशन्स आयोजित केले होते. यावर्षीच्या फ्लायर्स उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी ’डीपी हाऊस ऑफ मिडिया’ च्या संस्थापिका देवयानी पवार उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभिग्यान कार्यक्रम प्रमुख ऋषिराज बुधले यांनी कार्यक्रमाची माहिती दिली व यावर्षीच्या  अभिग्यान सोहळ्याची तारीख १३ नोव्हेंबर असेल हेही जाहीर केले.कार्यक्रमात फ्लायर्स प्रमुख प्रांजली सूर्यवंशी यांनी फ्लायर्स कार्यक्रमाची व्यापक माहिती दिली.

के आय टी चे संचालक मोहन वनरोटी यांनी शैक्षणिक अभ्यासाबरोबरच अभ्यासेतर उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. समितीचा विद्यार्थी अध्यक्ष ऋत्विक देशपांडे, कार्यक्रम प्रमुख प्रांजली सूर्यवंशी, अभिनय सहारे, श्रेया देसाई, जान्हवी कलांत्रे आदी या सोहळ्या साठी उपस्थित होते.   

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *