माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियाअंतर्गत ८७२ महिला, माता व गरोदर स्त्रियांची आरोग्य तपासणी…!

कोल्हापूर : “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानाअंतर्गत महापालिकेच्यावतीने शहरातील १८ वर्षावरील ८७२ महिला, माता व गरोदर स्त्रियांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत २६ सप्टेंबर पासून “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान राबविण्यात येत आहे. ही मोहिम शासनाने निर्देशानुसार राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शहरातील ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांतर्गत १८ वर्षावरील महिला, माता व गरोदर स्त्रिया यांचे वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. यावेळी १८ वर्षावरील महिला, माता व गरोदर स्त्रियांना आवश्यक त्या सर्व आरोग्य तपासण्या (रक्त,लघवी) करुन आवश्यक ती औषधे देऊन समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे शुक्रवार, दि.३० सप्टेंबर व ३ ऑक्टोंबर २०२२ रोजी गरोदर मातासाठी सोनोग्राफी शिबिरही आयोजित केलेले आहे.

गुरुवारी शहरामध्ये १८ वर्षावरील ८७२ महिला, माता व गरोदर स्त्रीयांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी १८ वर्षावरील एकूण ५३९ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी उच्चरक्तदाब निदान झालेल्या २१, रक्तक्षय आढळलेल्या २ मधुमेह निदान झालेल्या ४ महिला तपासणी अंती आढळून आल्या आहेत. तसेच ४२ महिलांची दंतरोग तपासणी करण्यात आली.

Advertisements

गर्भधारणापूर्व २३ महिलांची नोंदणी करुन तपासणी करण्यात आली व कुटुंब नियोजनाबाबत समुपदेशन करण्यात आले. त्याचबरोबर १०६ गरोदर मातांना वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करण्यात आली. त्यापैकी उच्च रक्तदाब निदान झालेली १ व १४ गरोदर मातांचे कोविड लसीकरण करण्यात आले. ४ गरोदर मातांचे नवीन बँक खाते उघडण्यात येऊन त्यांचे आधार कार्ड लिंक करण्यात आले. त्याचबरोबर ३० वर्षावरील २०४ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ महिलांचे थायरॉईड आजाराचे निदान झाले. तर २१ महिलांचे उच्च रक्तदाब, ६ महिलांचे मधुमेह व २ महिलांचे हृदयसंबंधी निदान झाले आहे.

तरी १८ वर्षावरील महिला, माता व गरोदर स्त्रिया यांनी आरोग्य तपासणीकरीता नजीकच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात जाऊन आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *