Getting your Trinity Audio player ready...
|
Read Time:1 Minute, 4 Second
कोल्हापूर : वाढत्या ताण-तणावाच्या जीवनशैलीत मानसिक आरोग्य धोक्यात आलेले आहे हे मानसिक आरोग्य सुखकर व्हावे, या हेतूने कोल्हापूरमध्ये मनोहिताय सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटरची स्थापना करण्यात आली. संजय रानमाळे व मनीषा रानमाळे यांच्या हस्ते सेंटरचे उद्घाटन झाले.
सेंटरमध्ये सायकोथेरपी, समोपदेशन, मानसिक मूल्यांकन व इतरही मनोसपचार पद्धतीचा समावेश आहे. आपल्या शरीराला जसे छोटे-मोठे आजार उदभवतात तसेच एकलकोंडेपणा मुळे व ताणतणावामुळे मन देखील आजारी होत असतं याकरिता मनोसपचार पद्धतीच्या सर्व सेवा उपलब्ध आहेत. हे सेंटर कोल्हापूरातील लोकांसाठी खुलं करण्यात आले असल्याचे शाल्मली रानमाळे यांनी सांगितले.