कृपाल यादव यांचे शालेय विद्यार्थ्यांसाठी ३०० मोफत कार्यशाळा अभिनव पद्धतीने इंग्रजी शिकवण्याचा ध्यास….!

0 0

Share Now

Read Time:7 Minute, 42 Second

विशेष वृत्त अक्षय खोत 

कोल्हापूर : मराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजी भाषेविषयी असलेला बागलबुआ इतका आहे की त्यामुळेच त्यांच्यात हि जगाची भाषा बोलण्याचा आत्मविश्वास येत नाही. इंग्रजी सोपी करून शिकवली तर विद्यार्थाना त्यांची गोडी लागेल आणि भीतीपेक्षा या भाषेसोबत त्यांची मैत्री होईल. या विचाराला कृतीची जोड देत कोल्हापुरातील सणगर गल्ली मंगळवार पेठ येथे राहणारे कृपाल रामचंद्र यादव हे अवलिया शिक्षक गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेच्या व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत इंग्रजी शिकवत आहेत. त्यासाठी यादव यांनी आजवर ३०० मोफत कार्यशाळा घेतल्या आहेत. 

महापालिकेच्या व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी भाषेची भीती कमी व्हावी, त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा या उद्देशाने कृपाल यादव यांनी महापालिकेच्या व जिल्हा परिषद शाळांमध्ये मोफत कार्यशाळा घेण्याचा उपक्रम सुरु केला. त्यांची ३०० वी कार्यशाळा नुकतीच श्री शिवराज विद्यालय, मंगळवार पेठ येथे घेण्यात आली. यादव यांनी त्यांच्या या समाज कार्याला मिशन “इनस्पायरिंग यंग इंडिया” असे नाव दिले आहे. त्यांचे कोणतेही एन.जी.ओ किंवा नॉन प्रॉफिट औरगनायझेशन नाही. ते सर्व कार्यशाळा स्वखर्चातून करतात. 

कृपाल यादव हे डॉ. डी. वाय. पाटील अकॅडेमीझ शांतिनिकेतन स्कूल, कोल्हापूर मध्ये इंग्रजी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.. एक सामाजिक उपक्रम म्हणून त्यांनी या मिशनची सुरवात केली. यामध्ये ते कोल्हापूर महापालिकेच्या व जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांना इंग्रजी व व्यक्तिमत्व विकास या विषयावरती कार्यशाळा घेतात. हे शिक्षण म्हणजे फळा, पुस्तक, अभ्यासक्रम अशा स्वरूपाचे नसून विविध प्रकारचे खेळ आणि गोष्टींच्या माध्यमातून ते मुलांना इंग्रजी शिकवतात. विद्यार्थ्यांच्या मनामधील इंग्रजीची भाषेची भीती निघून जावी, त्यांना इंग्रजी बोलता यावे, या उद्देशाने त्यांनी हि मोफत कार्यशाळा घ्यायला सुरवात केली. महापालिका व जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्यावर त्यांना जाणवले की बहुतांशी विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करीत शिकावे लागते. त्यामुळे पुरेसे शैक्षनिक साहित्य त्यांच्याकडे नसते. यावर कृपाल यांनी एक युक्ती लढवली. त्यांनी सोशल मीडीयावरून लोकांना मदतीचे आव्हान केले. हे आव्हान पैशाच्या स्वरूपात नसून ज्यांना शक्य होईल त्यांच्याकडून शैक्षनिक साहित्य स्वीकारले, जसे की वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल, कलरिंग बुक्स, रंगीत खडू इत्यादी. व ते कार्यशाळांमध्ये वाटण्यास सुरवात केली. गेली दहा वर्ष झाले त्यांचा हा उपक्रम सुरु आहे. नुकतीच त्यांनी ३०० वी मोफत कार्यशाळा शिवराज विद्यालय येथे घेतली. शाळेच्या मुख्याधिपिका नीता ठोंबरे यांनी रोप व पुस्तक देऊन कृपाल यादव यांचे स्वागत केले. यादव यांनी विविध कृतीतून विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषण कौशल्य व व्यक्तिमत्व विकास याचे धडे दिले. टीम बिल्डिंग, स्टेज डेरिंग कसे वाढवावे हे सोप्या कृतीतून सांगितले. भाविष्यातील स्पर्धेला तोंड देण्यासाठी इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व मिळवण्याची गरज आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. या प्रसंगी स्वप्नील राजाराम पाटील यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना कलरिंग बुक, रंग पेटी, व चोकोलेट्स भेट म्हणून देण्यात आली. कार्यशाळेला रामचंद्र यादव, सुनीता यादव, प्रियांका यादव, ओंकार यादव, सोनाली यादव, कृतिका यादव, प्रणया कुलकर्णी, सुधीर सणगर, विनायक रायबागी, प्रज्वल पतंगराय, ऋतुराज पगाडे व शिक्षक उपस्तित होते. झिनत पटेल यांनी सूत्रसंचलन केले व उत्तम जाधव यांनी यादव यांच्या समाज कार्याचे कौतुक केले व आभार प्रदर्शन केले.

गेल्या दहा वर्षात यादव यांनी बारा हजारहून अधिक विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेच्या ज्ञानासोबत शैक्षनिक साहित्याची मदत केली आहे. यादव यांनी एम.ए., बी.एड. या पदवीसह बी.बी.सी. इंग्लिश, केम्ब्रिज ई.एस.ओ.एल, स्कूल मानजमेंट, या विषयात पदविका शिक्षण घेतले आहे. तसेच अविअशन, हॉस्पिटॅलिटी व ट्रॅव्हल मानजमेंट या विषयात ते तज्ज्ञ आहेत.

डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्यापासून प्रेरणा

माजी राष्ट्रपती व जेष्ठ संशोधक डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी युवापिढी हे देशाचे भवितव्य असून युवापिढीच देशाला महासत्ता बनवेल या संदेशातून प्रेरित होऊन यादव यांनी त्यांच्या या उपक्रमाला मिशन – इनस्पायरिंग यंग इंडिया असे नाव दिले. 

मिशनचा थोडक्यात परिचय

मिशनची सुरवात – शैक्षनिक वर्ष २०११-१२ पासून 

आज सप्टेंबर २०२२ अखेर ३०० मोफत कार्यशाळा 

प्रशिक्षण संख्या – १२ हजारहुन अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण 

शैक्षनिक साहित्य वाटप – १५ हजारहुन अधिक शैक्षनिक साहित्य वाटप खाऊ वाटप – आजवर ३०,००० हुन अधिक चोकोलेट्स वाटप

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *