दुसऱ्या टी ट्वेण्टी मध्ये भारताने उभारला धावांचा डोंगर….!

MEDIA CONTROL ONLINE

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या भारतीय संघासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल यांनी स्पोटक सुरुवात केली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा घाम काढत १० षटकात ९६ धावांची भागीदारी केली. रोहित ४३ धावा काढून बाद झाला. त्यानंतर राहुलने २८ चेंडूवर ५७ धावांची वादळी खेळी केली. मालिकेतील त्याचे सलग दुसरे अर्धशतक ठरले. राहूल आऊट झाल्यानंतर अनुभवी विराट कोहली व टी ट्वेण्टी स्पेशल सूर्यकुमार यादव यांनी डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यांनी अक्षरशः विरोधी गोलंदाजांची पिसे काढत षटकार-चौकारांचा पाऊस पडला. कारकिर्दीच्या सुवर्ण फॉर्म मधून चाललेला सूर्या पुन्हा एकदा तळपला. अवघ्या १८ चेंडूंवर त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. २२ चेंडूवर ६१ धावांची तुफानी खेळी करत तो धावबाद झाला. विराट कोहली अखेरपर्यंत नाबाद राहत २८ चेंडूवर ५९ धावा तडकावल्या. दिनेश कार्तिकने अखेरीस येत पुन्हा एकदा आपला दम दाखवला आणि ७ चेंडूवर नाबाद १७ धावा फटकावल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी केशव महाराजने २ बळी मिळवले

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *