विशेष वृत्त: भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष
कृष्णराज धनंजय महाडीक

यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर महानगर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, महाडीक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणातील बॅनरबाजी, पुष्पगुच्छ स्वीकारणे किंवा दिखाऊ खर्च टाळण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्याऐवजी युवकांनी व नागरिकांनी गरजू व्यक्तींना मदत करावी, असे त्यांनी सोशल मीडियावरील व्हिडिओ संदेशातून स्पष्ट आवाहन केले.
“माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी खर्चिक शुभेच्छांऐवजी समाजातील वंचित घटकांना हातभार लावावा. वाढदिवस हा केवळ उत्सव नसून सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा दिवस असावा,” असा संदेश त्यांनी दिला. त्यांच्या या भूमिकेची युवा वर्गात सकारात्मक चर्चा होत असून, वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीला सामाजिक दिशा देणारा प्रयत्न म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.
दिवसभरातील प्रमुख कार्यक्रम/वेळ/उपक्रम
सकाळी १०.००
शिये येथील एचआयव्हीग्रस्त मुलांना खाऊ वाटप — वल्लभ देसाई यांच्या पुढाकाराने
सकाळी ११.००
पांजरपोळ येथे जनावरांसाठी चारा वाटप — इंग्रजीत कवाळे यांच्या सहभागातून
दुपारी १२.००
सीपीआर चौक येथे अन्नदान / जेवण वाटप — तलहा मणेर यांच्या वतीने
दुपारी १.००
हनुमान मंदिर, रेल्वे स्टेशन परिसरात छत्री वाटप — व्यंकटेश कोटमिरे यांच्या माध्यमातून
सायंकाळी ५.००
भाजपा कार्यालय, कोल्हापूर येथे कृष्णराज महाडीक शुभेच्छा स्वीकारणार
सायंकाळी ७.००
मिरजकर तिकटी, दूध कट्टा येथे ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत दूध वाटप
या सर्व कार्यक्रमांना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेत आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विश्वजीत भरत पवार यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

