धावांच्या आतिषबाजीत भारताची बाजी….! भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी ट्वेण्टी सामना भारताने १६ धावांनी जिंकला….!

MEDIA CONTROL ONLINE 

भारताने दिलेल्या २३८ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात कमालीची खराब झाली. कर्णधार टेंबा बवुमा ७ चेंडू खेळून एकही धाव न करता बाद झाला. रायली रुसोही खाते ही खोलू शकला नाही. ऐडन मार्करमने १९ चेंडूंवर आक्रमक ३३ धावांचे योगदान दिले. सुरुवातीपासून हळू खेळणारा क्विंटन डी कॉक नजर बसल्यावर मोठे फटके खेळण्यात यशस्वी ठरला. मात्र, अनुभवी डेव्हिड मिलरने पहिल्यापासून आक्रमक धोरण स्वीकारत २५ चेंडूवर अर्धशतक झळकावले.

Advertisements

डेव्हिड मिलरने अखेरच्या षटकापर्यंत नाबाद राहत कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. तो ४७ चेंडूत १०६ धावा काढत नाबाद राहिला. तर डी कॉकने ६९ धावा केल्या. भारतासाठी अर्शदीपने दोन बळी मिळवले. मालिकेतील अखेरचा सामना इंदोर येथे ५ ऑक्टोबर रोजी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *