निष्ठावान शिवसैनिक हिंदूत्वाच्या गर्जनेसह मुंबईकडे रवाना होणार….!

कोल्हापूर : मनात हिंदुत्वाची कास आणि उद्धवजी ठाकरे ना साथ …या एकाच घोषवाक्यसह हजारो शिवसैनिक उद्धवजी ठाकरे यांच्या विचाराचं सोनं लुटण्यासाठी शिवाजी पार्क मुंबईकडे दसऱ्या मेळाव्याला रवाना होणार ..एकीकडं गद्दारांचा मेळावा त्यासाठी लागलेली प्रचंड आर्थीक सुबत्तेची फौज सोबत अफाट आर्थिक पुरवठा आणी यासमोर शिवतीर्थावर जमणारा निष्ठावान शिवसैनिकांची .. स्वतःच्या तन-मन-धनान हरपून हिंदूत्वाचा व उद्धवजींचा जयघोष करत बाहेर पडणारे शिवसैनिक असं दुहेरी निष्ठेचा आणि गद्दारांच प्रदर्शन आज जनतेसमोर होते.आहे. निष्ठावान शिवसैनिकांचा एक जथ्था मुंबईकडे रवाना होणार आहे     

 शिवसैनिकांनी हिंदुत्वाचा जागर असणारे आपल्या स्व खर्चातून टी-शर्ट परिधान केले व त्या टि शर्टच वाटपाचंही काम आज जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले खरोखरच उद्धवजींच्या प्रती असणारी निष्ठा आणि शिवसेनेच्या प्रती असणारे प्रेम दाखवत भगव्याचा जयजयकार करत निघालेली ही शिवसेनेची फौज उद्या महाराष्ट्र वर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकविण्याचे जिद्द मनात धरून मुंबईकडे रवाना होणार आहेत यावेळी काही महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या

Advertisements

यावेळी उपस्थित संजय पवार,विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सुर्वे,धनाजी यादव, विकी मोहिते, दिनेश साळोखे, अतुल साळोखे, स्वरूप मांगले, केदार वाघापुरकर, प्रितेश दुग्गे, विनय क्षीरसागर, मानतेश पकाले, सरदार तिप्पे, जीवन पाटील,गोविंद वाघमारे ,सुरेश पोवार, विकास बुरबुसे, दिनेश परमार,राहुल माळी, विवेक काटकर, अभिजित पोरे,शुभांगी पोवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *