कोल्हापूर : भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने दि . ६ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे R.S.S. च्या मुख्यालयावर निषेध महारॅली काढणार आहोत . कोल्हापुरातून एक हजार पेक्षा अधिक कार्यकर्ते नागपूरला जाणार आहेत अशी माहिती बहुजन क्रांती मोर्चा चे जिल्हा संयोजक महेश बावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.बावडेकर म्हणाले, आर . एस . एस . प्रणित भा.ज. पा . चा घटनाद्रोह आहे. उत्तर प्रदेशात सुध्दा भा.ज.पा. सरकारद्वारे संविधान द्रोह आहे. ई.व्ही.एम. ( इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन ) चा गैरवापर आर . एस . एस . आणि भा.ज. पा.सुध्दा करत आहेत, ओ.बी.सी. ( इतर मागासवर्गीय ) यांची जातीनिहाय जणगणना न करण्याच्या विरोधात आरएसएस आहे. देशाची घटना बदलण्याचे षडयंत्र सुरु आहे त्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे.
आर . एस . एस . भा.ज.पा.द्वारे ओ.बी.सी. ना बळजबरीने हिंदु बनवण्यात येत आहे त्या विरोधात . आर.एस.एस.तर्फे आदिवासींना जबरदस्तीने हिंदु बनविण्यात येत आहे त्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.आर . एस . एस . च्यावतीने बौध्द विरासतींवर अवैध कब्जा केला जात आहे. आर . एस . एस . चे राष्ट्रावरचे नियंत्रण आणि इंद्रकुमार मेघवालची हत्या .. आर . एस . एस . चा राष्ट्रवाद ब्राम्हणी दहशतवादावर उभा आहे .. बिलकीस बानो या पिडीतेला न्याय कुठे मिळाला ? देशाच्या विषमतेला कारणीभूत असलेल्या राष्ट्रीय सेवक संघाच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बावडेकर यांनी दिली.
बावडेकर म्हणाले, भाजप व आर.एस.एस. भारत देशामध्ये संविधान संपवण्याचे षडयंत्र करत आहे , म्हणून आम्ही या मुद्द्यांच्या अनुषंगाने नागपूर येथील आर . एस . एस . मुख्यालयावर निषेध महारॅली काढत आहोत . नागपूरच्या या महारॅलीस कोल्हापूर जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने लोक जाणार आहोत . तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनांनी या रॅलीस पाठिंबा दर्शविलेला आहे , समर्थन दिलेले आहे . लोकशाही आबाधीत ठेवण्यासाठी संविधान वाचवणे गरजेचे आहे .
यावेळी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ ट्रेड युनियनचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत नागावकर, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष कुलदीप जोगडे, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद हर्षवर्धन, इंडियन लॉयर असोसिएशनचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विधीतज्ञ किरण कांबळे, बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य प्रवक्ता गौरव पणोरेकर उपस्थित होते.