कोल्हापूर येथील श्री शाहू छत्रपती मिलचा भोंगा पुन्हा सुरु झाल्याबद्दल भाजपाच्यावतीने आनंदोत्सव साजरा….!

कोल्हापूर : कोल्हापूर येथील श्री शाहू मिलच्या जागेवर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कार्यातील पाहिले पाऊल म्हणता येईल असा निर्णय वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने काल शासनाने घेतला असून, कोल्हापूर शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचा असणारा शाहू मिलचा भोंगा पुन्हा एकदा कोल्हापूरांना ऐकू येणार आहे. शाहू मिल बाबतच्या या निर्णयाबाबत भाजपा कोल्हापूरच्यावतीने शाहू मिलच्या दारात साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

याप्रसंगी महेश जाधव, विजय जाधव, बाबा इंदुलकर, कवाळे यांनी मनोगत व्यक्त केले. भोंग्या पासून होणारी सुरवात हि चांगल्या कामाची नांदी असून याबाबत सकारात्मक पाउल उचलणारे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विषेश आभार मानले. त्याचबरोबर येत्या काळात शाहू मिल दिमाखात सुरु होईल असे सांगत केंद्र सरकारच्या माध्यमातून आय.आय.टी सारख्या मोठ्या संस्था याठिकाणी येण्यासाठी त्यामाध्यमातून स्थानिकांना रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

Advertisements

शाहू महाराजांचे नाव घेऊन ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी कधी याविषयात विचार करून पुढाकार घेतला नाही. भोंगा सुरु होणे हि सुरवात असून याठिकाणातून अनेकांना पुन्हा रोजगार उपलब्ध होणार हि महत्वाची बाब असल्याचे नमूद केले. त्यामुळे यापुढील काळात मिलच्या जागेमध्ये स्मारक उभा न करता तरुणांना रोजगार उपलब्ध करून स्वत:च्या पायावर उभे करायचे हे शाहू महाराजांचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी सर्वांनी एकत्रित राहून मिलच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी सांगितले. 

यावेळी दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, राजू मोरे, विजय आगरवाल, सुनीलसिंह चव्हाण, अभिजित शिंदे, आजम जमादार, महादेव बिरंजे, रमेश दिवेकर, राजाराम परीट, सयाजी आळवेककर, गिरीश साळोखे, देवरथ लोंढे, महेश यादव, नजीम आत्तार, शाहरुख गडवाले, दिलीप बोंद्रे, अनिल कामत, विश्वजित पोवार, अक्षय मोरे, हर्षवर्धन पाटील, अरविंद वडगांवकर, विनय रंगलानी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *