विशेष वृत्त कौतुक नागवेकर
सांगली : देशाच्या व राज्याच्या प्रगतीत शिक्षण क्षेत्राचे योगदान महत्वपुर्ण आहे. हे क्षेत्र अधिकाधिक सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशिल असून महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या सांगली येथील अधिवेशनाच्या निमित्ताने या क्षेत्रातील मांडण्यात आलेल्या विविध ठरावांच्याबाबतीत सकारात्मक मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशिल राहू, अशी ग्वाही राज्याचे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन सांगली येथे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांची यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी महामंडळाच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे होत्या, यावेळी खासदार फौजिया खान, माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंत पाटील, माजी मंत्री आमदार विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार जयंत असगावकर, आमदार सुमनताई पाटील, आमदार किरण सरनाईक, आमदार चिमणराव पाटील, सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी, माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, माजी आमदार प्रा. शरद पाटील, हुतात्मा समुहाचे वैभव नायकवडी, महामंडळाचे सहकार्यवाह माजी आमदार विजय गव्हाणे, सहसचिव राजेंद्र साळुंखे, माजी आमदार भैय्यासाहेब रघुवंशी, अमरसिंह देशमुख, वसंतदादा सहकारी साखर काराखान्याचे संचालक विशाल पाटील, स्वागताध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्यासह महामंडळाचे विविध पदाधिकारी, संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षणावर होणारा खर्च ही गुतंवणूक समजून जीडीपीच्या सहा टक्के खर्च शिक्षणावर करावा, नवीन शैक्षणिक धोरण ठरविताना किंवा योजनांबाबत निर्णय घेताना शिक्षण संस्था महामंडळाच्या प्रतिनिधींचा समावेश करावा, विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना संपुर्ण सेवा संरक्षण द्यावे, विनाअनुदानित शाळांचा शिक्षकेत्तर अकृतीबंध जाहीर करावा. या साराख्या अन्य मागण्या या व्यासपीठावरुन करण्यात आल्या. या मागण्याबाबत समन्वयाने व सकारात्मक पध्दतीने मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशिल राहू, अशी ग्वाही कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली. यावेळी त्यांनी जिल्ह्याबाहेरुन आलेल्या संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी महामंडळाचे पदाधिकारी या सर्वांचे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सांगली जिल्ह्यात स्वागत केले.