कोल्हापूरात दैवज्ञ बोर्डिंग येथे बंगाली समाजाच्या वतीने महिषासूर मर्दिनीची आकर्षक अशा दुर्गादेवीची स्थापना केली आहे.

विशेष वृत्त अमोल पोतदार

कोल्हापूर : येथील बंगाली समाजाच्या वतीने दैवज्ञ बोर्डिंग येथे सुरू आज कुमारी पूजा, संधी पूजा आणि आरती करून दुर्गादेवीची आराधना करण्यात आली.कोल्हापुरात व्यवसाय-उद्योगाच्या निमित्ताने स्थायिक असलेल्या बंगाली समाज लोकांच्या वतीने येथील दैवज्ञ बोर्डिंग येथे सार्वजनिक श्री श्री दुर्गापूजा उत्सव मंडळाच्या वतीने गेल्या २३ वर्षांपासून दुर्गादेवीची उपासना केली जाते. त्याच अनुषंगे शनिवारी (ता. १) महाषष्ठीला घटस्थापना, मूर्तीपूजेने उत्सवास सुरवात झाली. १२ फूट उंच असणाऱ्या या मूर्तीसाठी माती कोलकता येथून आणली आहे. मूर्ती साकारणारे कलाकारही तेथीलच आहेत. पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये आज पूजा, होमहवन, कुमारी पूजन आणि संधी पूजा झाली.  

उद्या पूजा, पुष्पांजली आणि रात्री ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बुधवारी (ता. ५) दसऱ्याला दुपारी १२.३० ला मूर्तीचे विसर्जन होईल. त्या अगोदर सौभाग्यवतींसाठी सिंधुर उत्सवाचे आयोजन केले आहे.

बिश्वजित प्रामाणिक, संदीप मंडल, इंद्रजित सामंत, आशीष मंडल, देवाशीष देरिया, राजकुमार गुच्छाईत, मानस मिड्डा यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सहयोगातून उत्सवाचे नियोजन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *