Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर : आध्यात्मिक पाया आधारित विविध पैलूंनी सेवा कार्य तसेच महामार्गावर आधुनिक सुविधा सह कार्यरत ४० हून अधिक रुग्णवाहिका सह आरोग्य सेवा तसेच शेतकऱ्यांना कोरोना आणि महापुराच्या वेळी खातासह जनावारासाठी चारा वाटप करण्यापर्यंत वेळोवेळी केलेली मदत ही लाख मोलाची आहे आणि हे याचे अनुकरण समाजात सर्वत्र व्हावे अश्या शब्दात महानगरपालिका ज्येष्ठ नेते सत्यजित उर्फ नाना कदम यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या . शहरा नजीकच्या गडमुडशिंगी येथे पाटील मैदानात परमपूज्य शंकर जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज परिवार सत्संग मेळावा – पादुका दर्शन आणि भजन कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते . प्रारंभी पंचक्रोशीतून आलेल्या भाविकानी भगवे झेंडे – उपरणे सह भव्य मिरवणूक काढली . यामुळे एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले .परमपूज्य जगद्गुरु श्री नरेंद्रचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा – दीक्षा विधी हे या सोहळ्याचा केंद्र बिंदू होता .
अध्यात्म आधारित समाजातील गरीब गरजू ना मदत या पंरपरेनुसार सांगली – कोल्हापूर जिल्हयातील गरजू शेतकऱ्यांना १५१ हातपंपाचे मान्यवरांच्या हस्ते मोफत वाटप मान्यवराच्या हस्ते करण्यात आले . यावेळी सामाजिक कार्यकर्त्या गौरी ताई मुसळे ,राष्ट्रवादी महिला अध्यक्ष श्वेता बडोदेकर , ताई संस्थांनचे ट्रस्टी अभिजीत अवसरे ,सामाजिक कार्यकर्ते जागुष्टे, उद्योजक शिवाजीराव जाधव या मान्यवरांनी ही या भक्ती सोहळ्याचे व संस्थांच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले व आगामी काळात सहभागी होण्याचे अभिवचन ही दिले .
या आध्यात्मिक सोहळयात उत्तराधिकारी वंदनीय कनिफनाथ यांचे हितगुज पर प्रवचन सर्वाना एक मोठी सकारात्मक अनुभूती देणारे ठरले . या दिवसभरा च्या विविध सोहळ्यात सांगली – कोल्हापूर जिल्ह्यातील किमान १२ हजार भक्तगण सहभागी झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सेवा समिती व सर्व भक्तगणांनी गेले महिनाभर कष्ट घेतले होते त्यांच्या यशस्वी परिपुर्तीचा आनंद ही सर्वानी भाविकाना सांयकाळी भावपूर्ण निरोप देताना घेतला .