केआयटी अभियांत्रिकी व आंतरराषट्रीय कंपनी केनॊर ब्रेमसे कंपनीमध्ये सामजंस्य करार…..! अत्याधुनिक वाहन तंत्रज्ञानाचा होणार विद्यार्थ्यांना फायदा… !

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 8 Second

कोल्हापूर : कोल्हापूर येथील अग्रगण्य स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पुणे स्थित नामांकित आंतरराषट्रीय कंपनी केनॊर ब्रेमसे टेकनॉलॉजि इंडिया प्रायवेट लिमिटेड यांच्यामध्ये रोजी सामजंस्य करार करण्यात आला.

मूळची जर्मनी येथील आणि सध्या जगभरातील विविध देशांमध्ये कार्यरत असणारी केनॊर ब्रेमसे टेकनॉलॉजि सेन्टर इंडिया ही कंपनी वाहन आणि रेल्वे उद्योगांना लागणाऱ्या ब्रेकींग सिस्टिम्स बनवत आहे. मेकॅनिकल आणि इलेकट्रोनिक क्षेत्रामध्ये अनेक नावलौकिक उत्पादने बनवण्यात केनॊर ब्रेमसे कंपनीला यश आले आहे. केनॊर ब्रेमसे कंपनीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रथमच केआयटी महाविद्यालयाची निवड केलेली आहे. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये ब्रेकिंग सिस्टिम्स बाबत लागणारे अद्ययावत तांत्रिक ज्ञान हे विद्यार्थाना या सामंजस्य कराराद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. यामुळे कंपनीसाठी गरज असलेली कुशल मनुष्यबळ हे निर्माण होईल. केनॊर ब्रेमसे कंपनी बरोबरच सामंजस्य करार हा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उत्तम करिअर बनवण्यात मोलाचा वाटा उचलेल असा विश्वास केआयटी अध्यक्ष सुनिल कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

यावेळी केनॊर ब्रेमसे कंपनी मार्फत नीरजकुमार गुप्ता, कपिल जोशी, सागर कुंभार, मनोज जोशी हे उपस्थित होते . केआयटी महाविद्यालयामार्फत संस्थेचे अध्यक्ष सुनिल कुलकर्णी, उपाध्यक्ष श्री. साजिद हुदली, सचिव श्री. दीपक चौगुले, विश्वस्त सचिन मेनन,श्री. भरत पाटील आणि महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जीनी ,संचालक डॉ. मोहन वणरोट्टी, ट्रेनिंग प्लेसमेंट विभागप्रमुख डॉ.अमित सरकार,मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. उदय भापकर, ई अँड टी. सी. विभागप्रमुख डॉ. नितीन सांबरे, प्रा. अतुल निगवेकर , सिव्हिल विभाग प्रमुख प्रा.मोहन चव्हाण हे उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *