Getting your Trinity Audio player ready...
|
विशेष वृत्त अजय शिंगे
कोल्हापूर : न्यू पैलेस ते ऐतिहासिक दसरा चौक मार्गावर श्रीमंत शाहू छत्रपती याच्यासह शाही परिवाराचे फुलांचा वर्षाव करत जनतेने दिला शाही परिवाराला मानाचा मुजरा संपूर्ण राज्यच नव्हे; तर अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेला कोल्हापुरचा शाही दसरा महोत्सव आज बुधवारी अत्यंत थाटात आणि उत्साहात साजरा झाला. म्हैसुर नंतर देशातील सर्वात मोठा दसरा महोत्सव म्हणून ओळखल्यां जाणाऱ्या कोल्हापुरच्या शाही दसरा महोत्सवा साठी राज्य आणि देशभरातील नागरिकांनी उपस्थिती दर्शवत या महोत्सवाचा आनंद लूटला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, युवराज संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशस्वीनी राजे छत्रपती, यशराजे छत्रपती याच्यासह छत्रपती परिवाराच्या ऐतिहासिक मेब्याक या ऐतिहासिक शाही वाहनातून दसरा चौक येथे आलेल्या शाही परिवाराच्या सदस्यांच्या उपस्थितीत आणि हजारो नागरिकांच्या साक्षीने साजरा झालेला हा दसरा महोत्सव अविस्मरणीय ठरला.
गेले काही दिवस या दसरा महोत्सवाची जय्यत तयारी सुरु होती. गेली दोन वर्षे कोरोनामुळे दसरा महोत्सव साजरा झाला नव्हता. त्यामुळे यावर्षी अत्यंत भव्य प्रमाणात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते.विविध संस्था, संघटना ,शाळा महाविद्यालये देखील या नियोजनात सहभागी झाली होती. शाही परिवाराच्या प्रथें नुसार सायंकाळी पाच वाजुन एकोणसाठ मिनिटानी न्यू पैलेस मधून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज शाही परिवारासह राजवाड़ा प्रानग्नात दाखल झाले.त्यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, युवराज संभाजीराजे ,मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती ,यशस्वीनी राजे छत्रपती ,यशराजे छत्रपती मेब्याक या शाही वाहनासह इतर वाहनांमध्ये विराजमान झाले.त्यांच्या वाहनांच्या पुढे पोलीस जीप ,बुलेटवर स्वार झालेले पोलीस पथक आणि त्यामागे शाही परिवारातील मानकरी , सेवेकरी यांच्या वाहनांचा लवाजमा होता. अत्यंत शिसतीत हा लवाजमा नवीन राजवाडा येथून दसरा चौका कड़े रवाना झाला. वाटेत जागोजागी दुतर्फा जमलेले नागरिक ,विद्यार्थी फुलांचा वर्षाव करत शाही परिवाराचे स्वागत करत होते. या लवाजम्यात सहभागी झालेले पैलवानांचे पथक आकर्षण ठरले.
सायंकाळी ठीक सहा वाजता हा लवाजमा दसरा चौक येथे आला. येथे उभारन्यात आलेल्या शानियान्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चन्द्रकांतदादा पाटील , माजी मंत्री हसन मुश्रीफ ,सतेज पाटील, प्रशासक कादंबरी बलकवड़े,जिल्हाधिकारी राहुल रेखावार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण,विशेष पोलिस महानिरीक्षक जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवड़े आदि मान्यवर उपस्थित होते.
श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजुन वीस मिनिटानी मावळत्या सूर्याच्या साक्षीने शमीपुजन सोहळा झाला. त्यानंतर दसरा चौक येथे चोहो बाजूने उभ्या राहिलेल्या जनतेने लकड़ कोटाकडे घाव घेत सोने लूटले .त्यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि शाही परिवारातील सदस्य दुतर्फा उभ्या राहिलेल्या लोकांच्या शुभेच्छा स्वीकारत भवानी मंडप येथील भवानी मन्दिराकड़े दर्शनासाठी रवाना झाले .