Share Now
Read Time:1 Minute, 2 Second
Media Control Online
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देणारी बातमी आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवलं.गेल्या तीन दशकांपासून जे चिन्ह शिवसेनेच्या अस्मितेशी जोडलेलं होतं, ते धनुष्यबाणाचं चिन्ह आता शिवेसेनेच्या हातातून निसटलं आहे. निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीच्या तोंडावर हा तात्पुरता निर्णय देत हे चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे दोन्ही गटांना आता हे चिन्ह वापरता येणार नाही. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांचा या चिन्हावर दावा असणार नाहीये. सोमवारपर्यंत नव्या चिन्हासाठी तीन पर्याय दुपारी तीनपर्यंत सादर करावे लागतील.
Share Now