Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष मा . एस . सी . चांडक सो यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा . सचिव प्रितम पाटील यांच्या सुचनेनुसार दि ११/१०/२०२२ रोजी जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर येथे फिरत्या लोक अदालत मोबाईल व्हॅन चे उद्घाटन होणार असून सदरचे फिरते लोक अदालतसाठी असणारी व्हॅन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर , पन्हाळा , कागल , कळे खेरीवडे , गडहिंग्लज ,आजरा , चंदगड , गारगोटी , राधानगरी , इचलकरंजी , कुरुंदवाड , जयसिंगपूर , पेठवडगाव , मलकापूर शाहुवाडी , आशा चौदा तालुक्यामध्ये मोबाईल व्हॅन फिरणार असून दिवाणी फौजदारी अ दाखलपात्र आणि दाखलपूर्व केसेस या लोक अदालतमध्ये घेण्यात येणार असून तरी त्याचा कालावधी ११/१०/ २०२२ ते १० / १२/२०२२ या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यामध्ये आयोजन केले असून याद्वारे सर्व लोकांना आवाहन करण्यात येते की जास्ती जास्त केसेस मिटवून या फिरत्या लोक अदालतीचा लाभ घ्यावा.
” फिरत्या लोक अदालतीमुळे पक्षकारांची कटुता कमी होवून समाजात सलोखा वाढण्यास मदत होईल त्यासह पक्षकारांचा वेळ व पैसा यांची बचत होणार असल्याने फिरते लोक अदालत स्तुत्य आहे .