Share Now
Read Time:1 Minute, 8 Second
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर निलोफोर आजरेकर यांनी नगरसचिवांना पत्र पाठवून उद्या दि.१९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण सभा आयोजित केली होती.
त्यास सध्या देशासह संपूर्ण राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झपाट्याने होत असल्यामुळे शासनाकडून मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येतील, अशा सर्व प्रकारच्या सभा, कार्यक्रम ,सांस्कृतिक कार्यक्रम, घरगुती कार्यक्रम स्थगित करण्याबाबत शासनाने आदेश दिले आहे आहेत.
या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेची मार्च २०२० मधील आयोजित केलेली सभा स्थगित करण्यात यावी म्हणून महापौर नीलोफर आजरेकर यांनी नगर सचिवांना सभा स्थगिती करण्याबाबत पत्राने कळवले.
Share Now