कोल्हापूर प्रतिनिधी : (दिनेश चोरगे ) जागतिक मंदीचा सामना करणाऱ्या इंडस्ट्री झोन ला कोरोना व्हायरसचा धोका असल्याने , गोकुळ शिरगाव,कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत सुकसुकाट पसरला आहे. हातावरील पोट असणारे रोजदारी कामगार हवालदिल झाले आहेत. मोठया प्रमाणावर फौंड्री, कस्टर, उद्योग अडचणीत येण्याची भीती निर्माण झाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय कडून जमाव बंदी आदेश निघाल्यानंतर मुख्य बाजार पेठ,कारखाना कार्यस्थळ, लोजिंग बोर्डिंग,हॉटेल,ट्रान्सपोर्ट,रिक्षा,ट्रक, अवजड वाहने पुणे-बेंगलोर रस्त्यांवरन कारखान्याकडे जाताना दिसेनाशी झाली आहेत.जागतिक संकट ठरलेल्या कोरोना व्हायरसचा परिणाम गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे.
नुकतेच सुरू झालेले कारखाने परत बंद होताना दिसत आहेत.आजही गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत विलो माथरआन्ड प्लांट,मॉन्टी प्रा.ली, या कंपन्या जर्मनच्या असून तिकडुनच या कंपनीचे व्यवस्थापनाचे काम चालते. मार्वलस विमरकट्टी. प्रेसीफाब, ईफको, या कंपन्या परदेशातील कंपन्यांच्या बरोबर भागीदारीत काम करत आहेत. त्यामुळे यांच्याकडे येणारे परदेशी उद्योजक थांबले आहेत.हवाई अड्ड्यावर ही कोंडी झाली असल्यामुळे संपर्क ही होईनासा झाला आहे. कित्येक इंडस्ट्रीत परदेशातून कच्चामाल येत असतो. हा माल ही येत नसल्याने काम थांबविण्याची वेळ उद्योगाच्यावर आली आहे.
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या चार दिवसापासून पूर्ण शुकशुकाट पाहायला मिळत आहे. ह्या कंपन्या सुरळीत चालू होत नसल्याने टेम्पो चालक तसेच छोटे आपे रिक्षा चालक यांना स्टॉप वरच आपल्या गाड्या लावून गाडी भाडे येण्याची वाट पाहावी लागत आहे. नुकतीच पूर्वपदावर येत असलेले औद्योगिक वसाहत पुन्हा या व्हायरसच्या विळख्यात अडकल्याने कामगार वर्ग. उद्योजक. टेम्पो चालक क्रेन मालक .हॉटेल व्यावसायिक संकटात सापडला आहे. त्यात एकमेकांना आधार देणारे उद्योग धंद्यावर राबणारे व अवलंबून असलेले कामगार वर्ग हवालदिल झाला आहे.