महावितरणच्या ऑनलाईन सेवांचा वापर करा – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 32 Second

कोल्हापूर दि.१९ : राज्यात करोना विषाणू बाधित वाढत्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे कोटेकोरपणे पालन करण्यासोबत वीज ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी तसेच वीज पुरवठ्याशी संबंधित  महावितरणच्या उपलब्ध सर्व ऑनलाईन सेवेचा वापर करावा असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे

वीज बिल भरण्यासाठी, नवीन वीज जोडणीसाठी, अर्ज करण्यासाठी, वीज पुरवठ्याशी संबंधित तक्रार दाखल करण्यासाठी महावितरणच्या ग्राहकांनी www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर, महावितरण मोबाईल ॲपवरून सर्व लघुदाब ग्राहकांना डेबिट कार्ड , क्रेडिट कार्ड, नेटबँकीग, मोबाईल वॅलेट तसेच कॅश कार्डचा वापर करून वीजबिल भरता येते. याशिवाय विविध ऑनलाईन सुविधेबाबत महावितरणच्या संकेतस्थळावरील कंझुमर पोर्टल या विभागात ग्राहकांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त महावितरणच्या ग्राहकांना १८००-१०२-३४३५ / १८००-२३३-३४३५ /१९१२ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून आपली तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

कोल्हापूर परिमंडळातील महावितरणच्या सर्व कार्यालयामध्ये प्रशासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती शासन आदेशानुसार ५० टक्यांवर आणून कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे निर्देशित केले आहे. यासोबतच अति महत्वाचे कामे असेल त्याच ग्राहकांना कार्यालयात प्रवेश दिला जात आहे. ग्राहकांनी अनावश्यक गर्दी टाळून, ऑनलाईन सेवा वापराव्यात व महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता श्री. अनिल भोसले यांनी केले आहे.

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *