अखेर मृतदेह सापडला…! राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे यांचा मृतदेह नीरा नदीच्या पात्रात सापडला….!

MEDIA CONTROL ONLINE

राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे यांचा मृतदेह सापडला आहे. दोन दिवसांपासू ते बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरु होता मात्र, शोध सुरु असताना NDRF च्या पथकाला मृतदेह शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह नीरा नदीपात्रात सापडला आहे. घोरपडेंची आत्महत्या की हत्या आता या प्रकरणाचं गुढ आता आणखी वाढलं आहे. येणारा काळ खूप वेगळी वळण घेणार असल्याची शक्यता आहे.

शशिकांत घोरपडे हे मूळचे साताऱ्याचे आहेत. साताऱ्यातल्या शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. कालपासून त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरु होता. अखेर आज दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह शोधण्यात NDRF च्या जवानांना यश आलं. प्रथमदर्शनी तरी शशिकांत घोरपडे यांनी आत्महत्या केल्याचं दिसून येतंय. मात्र यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *