कोल्हापूर : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कोल्हापूर विभागा अंतर्गत कोल्हापूर रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील १८ शाखा कार्यांलये व विभागीय कार्यालयामधील कार्यरत ११० हंगामी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या परिवाराला फराळासाठी लागणारे सर्व साहित्यांची भेट देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याची वर्षानुवर्षाची परंपरा भारतीय विमा कर्मचारी सेनेच्या कोल्हापूर युनिटने आज एका कार्यक्रमात पार पडली
कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी येथील एल.आय.सी शाखा कार्यालयात रविवारी दिनांक १६/१०/२०२२ रोजी सकाळी फराळ साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माननीय संजय पवार साहेब हे प्रमुख पाहुणे व कोल्हापूर शहर प्रमुख रविकिरण इंगवले साहेब आणि भारतीय विमा कर्मचारी सेनेचे पश्चिम क्षेत्रीय अध्यक्ष अनंत वाळके साहेब व सरचिटणीस दिपक मोरे, सेंट्रल कमीटीचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित सर्व हंगामी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते फराळ वस्तू वाटप करण्यात आले. सदर चा कार्यक्रम गेली दहा वर्षापासून भा वि क सेना कोल्हापूर युनिटचे अध्यक्ष संग्राम मोरे, सेक्रेटरी संजय वडगावकर व इतर पदाधिकारी व संघटनेचे सभासद तळमळीने व एक दिलाने सामाजिक बांधिलकी जपत यशस्वीपणे पार पाडत आहेत असा उदात्त उपक्रम करणारे भारतीय विमा कर्मचारी सेनेचे कोल्हापूर युनिट हे एकमेव आहे याबद्दल मान्यवरांनी कौतुकाचे गौरव उद्गार काढले
आपल्या भाषणात दीपक मोरे यांनी व संग्राम मोरे यांनी सदर उपक्रमाबद्दल तसेच हंगामी चतुर्थ श्रेणी कर्मचारी सेवेत कायम करण्यासाठी भा.वि.क.सेना करत असलेल्या कायदेशीर लढाई व व्यवस्थापनासोबत होत असलेल्या बोलणी संदर्भात माहिती दिली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यात संघटनेच्या समस्त पदाधिकारी तसेच पुढील सभासद बंधू भगिनींचे मोलाचे योगदान लाभले. संतोष सरिकर, महेश दिवेकर, राजू सुतार , युवराज कांबळे, संभाजी मांगुरकर, संभाजी नाईक, जयसिंग मिसाळ, भरत ऊरुणकर, शिवाजी हंचनाळे, सतीश दाखले, राजू यादव, संतोष मोरे, विजय लिंगूरकर.