घरफाळा विशेष कॅम्पमध्ये बावीस इमारतींना मालमत्ता कराची आकारणी….!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 45 Second

कोल्हापूर : घरफाळा विभागाच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या विशेष कॅम्पमध्ये २२ मिळकतींना मालमत्ता कराची आकारणी करण्यात आली. शहरातील ज्या मिळकतीवर (इमारतींवर), खुल्या जागेवर अद्यापही कर आकारणी केलेली नाही अथवा ज्यांनी अद्याप मिळकतीवर मालमत्ता कराची आकारणी करुन घेतलेली नाही अशा मिळकतधारकांसाठी गांधी मैदान येथे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. घरफाळा विभागाच्यावतीने सोमवारी विभागीय कार्यालय क्रं.१ गांधी मैदान (घरफाळा ऑफिस) अंतर्गत नविन कर आकारणी करणेकरीता ४ अर्ज व खुल्या जागेवर करआकारणीकरीता १ मिळकतधारकाने अर्ज सादर केला होता. त्याप्रमाणे प्राप्त ५ अर्जांवर कागदपत्र मागणीबाबत जागेवर नोटीस देवून पुढील दोन दिवसात त्यांची कामे निर्गत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच मागील आठवडयापर्यंत प्राप्त घरफाळा विभागाकडे प्राप्त झालेल्या एकूण २२ अर्जदारांच्याकडून योग्य कागदपत्रांची पुर्तता करूण घेवून नविन २२ मिळकतींची कर आकारणी अंतीम करण्यात आली. यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियममधील कराधान नियम ८ कलम ५ (१) नुसार कर आकारणी करुन देण्यात आली. या सर्वांना जागेवर १५/२ ची नोटीस लागु करून कर आकारणी अंतीम करून २२ प्रकरणे निर्गत केली. या कॅम्पला गांधी मैदान येथे उप-आयुक्त शिल्पा दरेकर व कर निर्धारक संग्राहक सुधाकर चल्लावाड यांनी भेट देवून मार्गदर्शन केले. तर कर अधिक्षक प्रताप माने यांनी दिवसभर कार्यालयात उपस्थित नागंरिकांच्या तक्रारींचे निवारण केले.

मंगळवार, दि.१८ ऑक्टोंबर २०२२ रोजी विभागीय कार्यालय क्र.२, छत्रपती शिवाजी मार्केट (घरफाळा विभाग) येथे विशेष कॅम्पचे आयोजन केले आहे तरी नागरीकांनी या लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासक डॉ.कांदबरी बलकवडे यांनी केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *