Getting your Trinity Audio player ready...
|
विशेष वृत्त
काजल बुवा/अवनी पाटील
कोल्हापुर : आज तुम्ही ज्याला ग्लोबल ब्रॅण्ड म्हणत आहात ते कधी काळी असेच लोकल ब्रॅण्ड होते. मात्र, तिथल्या स्थानिक लोकांनी त्या वस्तूंचा वापर सुरु केला. त्यांनी त्या वस्तूंचा प्रचार आणि ब्रँण्डींग केली. याशिवाय त्या वस्तूंप्रती अभिमान बाळगला. त्यामुळे ते वस्तू आणि लोकलहून ग्लोबल बनले. त्यामुळे दररोज प्रत्येक नागरिकाने आपल्या लोकलसाठी व्होकल बनायचं आहे. लोकल वस्तू खरेदी करुन त्याचा प्रचार करायचा आहे.
“कोरोना संकंटादरम्यान आपल्याला लोकल उत्पादन, लोकल मार्केट, लोकल सप्लाय चेन याचंही महत्त्व समजलं आहे. संकंट काळात लोकलनेच आपली मागण्यांची पूर्तता केली होती. आपल्याला या लोकलनेच वाचवलं आहे. लोकल फक्त गरजच नाही तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.
जेव्हा आपण सण, उत्सवांबद्दल बोलतो, तयारी करतो. तेव्हा सर्वात अगोदर मनात हेच येतं की, बाजारात कधी जायचं? नेमकी काय काय खरेदी करायची. विशेषत: लहान मुलांमध्ये याबाबत मोठा उत्साह असतो. मात्र यंदा तुम्ही जेव्हा खरेदीसाठी जाल, तेव्हा व्होकल फॉर लोकलचा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा. बाजारातून सामान खरेदी करताना, आपल्याला स्थानिक उत्पादनांना प्राथमिकता द्यायची आहे”
लवकरच दिवाळीला सुरुवात होईल. कोरोनाचं संकट संपल्यानंतर सर्वात मोठी दिवाळी असल्याने वस्तूंची खरेदी करताना आपल्या स्थानीक ठिकाणी तयार झालेल्या उत्पादनांना प्राधान्य द्या. सणासुदीआधी, सणासुदीच्या दिवसांत लोक अनेक आवश्यक वस्तूंची खरेदी करतात. त्यावेळी स्थानिक वस्तू खरेदी करून एक दिवाळीचा दिवा त्यांच्या घरी देखील आपण लावू शकतो…
आजकाल सर्वानाच जलद आणि सोईस्कररित्या सर्व गोष्टी पाहिजेत म्हणूनच दैनंदिन जीवनातील असो किंवा सणासुदीची खरेदी असा, या सर्वासाठी आपण online Shoping म्हणून मार्ग स्वीकारतो आणि स्वतःला डिजिटल पिढी गिरवतो, पण या सर्व गोष्टींमुळे आपल्या आजूबाजूतील स्थानिक व्यापाऱ्यांना कुठेतरी आपण विसरत आहोत,अगदी आताचाच विचार करायचा झाल्याल दसरा-दिवाळीच्या या दिवसांमध्ये आपण करत असलेली खरेदी किती लोकल आहे? आणि किती online आहे? याची प्रचिती प्रत्येकाल आलीच असेल, स्थानिकांसाठीचा आवाज पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे
त्यामुळे आजपासून प्रत्येकाने स्वतः शी संकल्प केला पाहिजे की, ‘माझी खरेदी ही लोकल व्यापा-यांकडेच करायची असा निश्चिय हढ झाल्यास स्थानिक व्यापान्यांना पुढे येण्यात वेळ लागणार नाही. कदाचित दिवाळीसाठीच्या आपल्या खरेदीमूळे त्यांची दिवाळी सुखकर होईल, मार्केटमधील एक पंती खरेदी किल्याने त्यांच्या घरान रोशनाई येईल तुम्ही जरूर online खरेदी करा, तुम्ही नक्कीच मोठ मोठ्या मॉलमध्ये खरेदी साठी जा पण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या स्थानिक व्यापान्यांना विसरून नका जाऊ कारण समाज आपला आहे, मग कर्तव्य जबाबदाऱ्या पण आपल्याच असाव्यात? आजपासून आपल्याला आपली दिवाळी तर आनंददायी ‘बनवायची आहे पण आपल्या स्थानिक व्यापाऱ्याची सुद्धा दिवाळी तेजोमय करायची आहे.
आपण जर स्थानिक बाजारात फेरफटका मारला तर आपल्या नजरेल येईल की, घरी तयार केलेल्या विविध आकाराच्या, रंगाच्या आणि विभिन्न प्रकारच्या पणत्या आपणास दिसतील या दिव्याची असलेली ती छोटी-छोटी दुकाने आपण पाहतो, पण प्रत्येकाने फक्त बघ्याची भूमिका न घेता, त्या ठिकाणाहून खरेदी केली पाहिजे अशाप्रकारे आणखी विभिन्न वस्तु बाजारपेठेत उपलब्ध आहेत जसे की आकाश कंदिल असेल कपड्याच्या अनेक प्रकार असतील, सुगधी अगरबती किंवा मग लक्ष्मी पुजेसाठी लागणारे साहित्य,अतिशय सुंदर, रांगोळीचे स्टॉल आकाश कंदील, प्रकाशित व उत्साही विविध दिवे, घर सजावटीचे साहित्य, बघुन डोळ्यांनाच आकर्षण वाटते,
इत्यादी गोष्टी आपल्याला स्थानिक दुकानदाराकडून योग्य दरात उपलब्ध होत आहे, तर मग आपण प्रत्येकाने आपली खरेदी स्थानिक व्यापा-यांकडून केली पाहिजे जेणेकरून vocal for Local च्या या संकल्पनेत आपला देखील हातभार लागेल.चला तर मग आपली दिवाळी खरेदी स्थानिक व्यापा-यांकडेच असावी त्यासाठी आता आपणच पुढाकार घेतला पाहिजे….