Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर : उत्तर दायीत्व कालावधीमधील ठकेदारांमार्फत करण्यात येत असलेल्या व महापालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या डांबरी पॅचवर्कच्या कामाची प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दुपारी अचानक पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उप-शहर अभियंता एन.एस.पाटील, बाबुराव दबडे उपस्थित होते.
दुपारी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी अचानक प्रतिभानगर, रेडयाची टक्कर येथील महाराष्ट्र नगोरोत्थान अभियानाअंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी ठेकेदाराकडून करण्यात येत असलेल्या पॅचवर्कचे टोचन करुन कामाचा जाडीची व लेव्हलची तपासणी केली. यानंतर रोलींग केलेनंतर त्याच्या जाडीचीही पाहणी केली. यानंतर टाकाळा येथील दिघे हॉस्पीटल ते उड्डानपुल रोडवरील ठकेदारामार्फत करण्यात येत असलेल्या कामाचीही पाहणी केली. यानंतर महापालिकच्यावतीने करण्यात येत असलेल्या शाहू नाका ते उड्डाणपूल, हॉकी स्टेडीयम, शेंडा पार्क येथील कामाची पाहणी केली. यावेळी प्रशासकांनी ठेकेदाराकडून करण्यात येत असलेल्या कामाचे थर्डपार्टी ऑडीट करुन घेणे, डांबराचे प्रपोषण करणे, एस्टीमेटप्रमाणे काम करुन घेणेच्या सूचना दिल्या.
त्याचबरोबर विभागीय कार्यालय क्र.४ अंतर्गत महापालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या आदित्य कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्याच्या कामाची अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टिना गवळी यांनी पाहणी केली. यावेळी उप-शहर अभियंता हर्षजीत घाटगे उपस्थित होते. तसेच विभागीय कार्यालय क्र.२ अंतर्गत महालक्ष्मी नगर ते वाय.पी.पोवार नगर व रंकाळा येथील डि मार्ट समोरील रस्तेचे पॅचवर्क करण्यात आले आहे. यावेळी उप-शहर अभियंता नारायण भोसले उपस्थित होते.