कोल्हापूर : शहरामध्ये डेंग्यु, चिकनगुनियाची साथ येऊ नये यासाठी महापालिकेच्या किटकनाशक विभागाकडून दैनंदिन औषध फवारणी, धुर फवारणी व डास अळी कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे. मंगळवारी शिवाजी पेठ] माळी गल्ली या परिसरात महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत दैनंदिन औषध फवारणी, धुर फवारणी व डास अळी कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. याठिकाणी ५८ घरांची तपासणी करण्यात आली. यामध्ये या घरातील ८० कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ घरांमधील ६ कंटेनर दुषित असलेचे सर्व्हेक्षणात आढळून आले. तर रिकामे न करता येणा-या २ कंटेनरमध्ये १% टेमिफॉसचे द्रावण टाकण्यात आले. किटकनाशक विभागामार्फत या संपूर्ण परिसरामध्ये औषध व धुर फवारणी करण्यात येऊन या भागात नागरी केंद्रामार्फत दैनंदीन सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. यावेळी संशयीत तापाच्या रुग्णांचे रक्ताचे नमुणे तपासणीसाठी घेण्यात येत आहेत.
त्याचबरोबर शहरामध्ये इतर ठिकाणी २९० घरांची तपासणी करण्यात आली. या सर्व्हेक्षणात २९० कंटेनरची तपासणी करुन ११ घरांमधील १६ कंटेनर दुषित असलेचे आढळून आले. तर रिकामे न करता येणा-या ३ कंटेनरमध्ये १% टेमिफॉसचे द्रावण टाकण्यात आले. हे सर्व्हेक्षण लक्षतीर्थ वसाहत, भोई गल्ली, लक्ष्मीपूरी, कोष्टी गल्ली, मंगळवार पेठ, बेलबाग, यल्लामा मंदीर जवळ, बी डी कामगार चाळ या ठिकाणी किटकनाशक विभागाच्या पथकामार्फत करण्यात आले आहे.
तरी शहरातील नागरीकांनी खबरदारीचा उपाय म्हणून नारळाच्या करवंटया, खराब डबे, वापरात नसलेले टायर यांची वेळीच विल्हेवाट लावावी, आठवडयातुन एक दिवस कोरडा दिवस पाळावा, फ्रिजच्या मागील पाण्याचे ट्रे, झाडाच्या कुंडया यामध्ये पाणी साचू देऊ नये तसेच सर्व्हेक्षणासाठी येणा-या आरोग्य कर्मचा-यांना नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.