Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर : आज भाजपा राष्ट्रीय सह संघटन मंत्री मा. शिवप्रकाश हे कोल्हापूर दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी कोल्हापूर शहर व ग्रामीण, सातारा सांगली शहर व ग्रामीण अशा जिल्ह्यांच्या संघटनात्मक कोअर कमिटीच्या बैठका घेऊन आढावा घेतला.
गेल्या आठ वर्षात नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या असून याचा लाभ सर्वांना होत आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशांमध्ये अनेक मोठे निर्णय होत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील देशाचे नाव उंचावले गेले आहे. अजूनही मुद्रा, जनधन, उज्वला गॅस, मातृवंदन, किसान समृद्धी, आयुष्यमान भारत, पंतप्रधान आवास, गरीब कल्याण अशा अनेक योजना अजूनही तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काम केले पाहिजे. केंद्रीय सहकार मंत्री अमितभाई शहा हे महाराष्ट्रातील सहकारी संस्थांचे जाळे आणखीन मजबूत कसे होईल याकडे लक्ष घालण्यात सक्षम आहेत. तरी आपण महाराष्ट्रातील सहकारी चळवळ आणखीन चांगल्या पद्धतीने चालवून आणखी सहकारी प्रकल्प, योजना महाराष्ट्रात उभा करून सर्वसामान्य जनतेच्या हाताला काम मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागेल ती मदत अमितभाई करतील असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश कार्यालय प्रभारी रवीजी अनासपुरे, निवडणूक प्रमुख प्रदेश उपाध्यक्ष सुनीलजी कर्जतकर, सुरेश हळवणकर, विभाग कार्यालय प्रमुख योगेशजी बाचल, राजे समरजीतसिंह घाटगे, राहुल चिकोडे महेश जाधव, अमल महाडिक, हिंदुराव शेळके, अशोक देसाई नाथाजी पाटील, विजय जाधव, विठ्ठल पाटील, शौमिक महाडिक,नाना कदम, विजय सूर्यवंशी, अजित ठाणेकर, दिलीप मैत्रिणी, साताऱ्याचे विक्रम पावसकर, शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, अतुलबाबा भोसले,सांगलीचे पृथ्वीराज देशमुख, मदनदादा भोसले आदी उपस्थित होते.