स्वतःमधली कला जिवंत ठेवा आणि जोपासा!: वैभव मांगले…!

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 27 Second

कोल्हापूर : प्रत्येक विद्यार्थ्यांकडे काही तरी खास गोष्ट असतेच त्याचा वेळीच शोध घ्यावा व स्वतःमधली कला जिवंत ठेवा आणि जोपासावी असा सल्ला  प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले यांनी  दिला ते केआयटीमध्ये आयोजित अभिग्यान पूर्वरंग सोहळ्यामध्ये प्रकट मुलाखतीत दिलखुलास व्यक्त झाले.

के.आय.टी. अभियांत्रिकी महाविद्यालयातील वॉक विथ वर्ल्ड ह्या विद्यार्थी समितीने आयोजित केलेला अभिग्यान पूर्वरंग सोहळा २०२२  हा कार्यक्रम ५ नोव्हेंबर  रोजी कोल्हापुरातील केआयटीचे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय येथे संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमास प्रमूख पाहुणे  सुप्रसिद्ध मराठी अभिनेते वैभव मांगले उपस्थित होते. 

कार्यक्रमात वॉक विथ वर्ल्ड समिती ची माहिती विद्यार्थी समिती अध्यक्ष ऋत्विक देशपांडे याने दिली. अभिग्यान २०२२ कार्यक्रमाचे प्रमुख ऋषिराज बुधले, श्रीदीप चव्हाण यांनी अभिग्यानची व्यापक माहिती दिली.  प्राध्यापक अमर टीकोळे यांनी प्रमुखे पाहुणे यांचा परिचय करून दिला. चेअरमन सुनील कुलकर्णी सर ह्यांच्या हस्ते वैभव मांगले ह्यांचा सत्कार करण्यात आला 

वैभव मांगले यांची प्रकट मुलाखत प्राध्यापक प्रमोद पाटील यांनी घेतली.  वैभव मांगले यांच्या खुमासदार बोलण्याने कार्यक्रमाची शोभा वाढली. सिनेसृष्टीमधील त्यांचे अनुभव, मजेशीर किस्से , टाईमपास चित्रपटातील संवाद यामुळे कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली. पहिले नाटक मिळवण्याची धडपड ते अभिनेता म्हणून मिळालेली प्रसिद्धी हा त्यांचा रोमहर्षक प्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी होता. 

युवा पिढी घडवण्यासाठी मांडलेल्या यज्ञात विचाररूपी समिधा समर्पित करण्यासाठी दरवर्षी विविध क्षेत्रातुन तज्ञ वक्ते येत असतात. पूर्वरंग सोहळ्यात अभिग्यान २०२२ पोस्टरचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले तसेच वक्त्यांची नावे जाहीर करण्यात आली. अभिग्यान च्या व्याख्यानमालेत दहावे विचारपुष्प गुंफण्यासाठी ह्या वर्षी प्रमुख वक्ते म्हणून आनंद देशपांडे (संचालक परसिस्टंट सिस्टिम) , गिरीश कुलकर्णी(मराठी अभिनेते), प्रफुल्ल वानखेडे(संस्थापक केलविन्स ग्रुप) , अतुल गोतसुर्वे(IFS नॉर्थ कॉरिया) ,  गिरीश प्रभुणे (समाजसुधारक)  येणार आहेत. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष चेअरमन सुनील कुलकर्णी सर, कार्यकारी संचालक डॉ. विलास कार्जींनी,  संचालक वनरोट्टी सर यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व Hod’s , डीन, प्राध्यापक सल्लागार प्रमोद पाटील सर, अरुण देसाई सर, अमर टीकोळे सर हे या वेळी उपस्थित होते. केआयटी अध्यक्ष सुनिल कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दिपक चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिका वेंगुर्लेकर आणि अमेय कुंभार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता श्रीदीप चव्हाण याने आभार प्रदर्शन मानून केली. 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *