रस्त्याच्या कामाची उप-आयुक्त शिल्पा दरेकर यांच्याकडून पाहणी

कोल्हापूर : उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी रस्त्यांच्या कामांची सकाळी उप-शहर अभियंता नारायण भोसले यांच्या समवेत पाहणी केली. यामध्ये उप-आयुक्त यांनी विभागीय कार्यालय क्रं.२ अंतर्गत तोरस्कर चौक ते संजय गायकवाड पुतळा रोड, भगतसिंग चौक ते तोरस्कर चौक, प्र.क्र. ४५ कैलासगडची स्वारी मंदिर अंतर्गत माळी चेंबर ते मंडलिक घर, सोन्यामारुती चौक, शिवाजी चौक आय.डी.बी.आय. बँक मागील रस्ता या परिसरात सुरु असलेल्या डांबरी रस्त्याच्या कामाची पाहणी केली. 

      त्याचबरोबर शहरात विभागीय कार्यालय क्र.१ अंतर्गत डायना कॅसल, कळंबा फिल्टर हाऊस ते कळंबा जेल, रामानंदनगर पुल, चिवा बाजार याठिकाणी रस्ते डांबरीकरण करण्यात येत आहेत. विभागीय कार्याल क्रं.३ अंतर्गत टाकाळा रोड, पांजरपोळ याठिकाणी महापालिकेच्यावतीने पॅचवर्कची कामे सुरु आहेत. विभागीय कार्यालय क्र.४ अंतर्गत, एस.टी.स्टॅन्ड, शाहूपुरी पोलिस स्टेशन रोड, परिख पूल, महालक्ष्मी चेंबर, खरे मंगल कार्यालय या रस्त्यांचे पॅचवर्क करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *